News Flash

TOP 10 NEWS : मराठी ‘बिग बॉस’पासून ‘गुलाबजाम’ चित्रपटाच्या टीझरपर्यंत

सलमानने मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी सांगितली.

सलमान खान

‘नमस्कार, मी बिग बॉस..’ असे शब्द लवकरच तुमच्या कानावर पडणार आहेत. कारण, हिंदी टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ आता मराठीतही येणार आहे. ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वाची नुकतीच सांगता झाली. ‘भाभीजी घर पे है’ फेम शिल्पा शिंदेला रविवारी बिग बॉसची विजेती घोषित करण्यात आले. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध ‘बहूराणी’ म्हणजेच हिना खानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पण, या अंतिम फेरीच्या सोहळ्यात सलमान खानने केलेल्या एका घोषणेने सर्वांचे लक्ष वेधले. ती घोषणा होती ‘बिग बॉस मराठी’ची.

‘बिग बॉस ११’च्या विजेत्याचे नाव जाहिर केल्यानंतर सलमानने मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी सांगितली. लवकर बिग बॉसचा आवाज मराठीतही घुमणार असल्याचे त्याने जाहिर केले. शोची प्रसिद्धी आणि मराठी प्रेक्षकांचा विचार करता ‘एन्डमॉल शाइन इंडिया’च्या निर्मात्यांनी बिग बॉस हा शो मराठीतही आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यांमध्येच शोला सुरुवात होणार असल्याची माहिती एन्डमॉल शाइन इंडियाच्या सुत्रांनी दिली आहे.

‘नमस्कार, मी बिग बॉस बोलतोय..’

२ रुपयांत सलमान खानसोबत अक्षय कुमारने बनवले सॅनिटरी नॅपकीन

..अन् सई-अमृता आल्या एकत्र!

आम्ही लग्नाचा विचार केलाय, पण…

हृतिकबरोबरच्या अफेअरबद्दल कंगना म्हणते, ‘ना वो रोशनी थी ना अंधेरे..’

Bigg Boss 11: शिल्पा शिंदेने ‘बिग बॉस’च्या अंतिम सोहळ्यात रचला इतिहास

‘पद्मावत’ आणि ‘पॅडमॅन’ या दोन्ही चित्रपटांना फटका बसणार- ट्विंकल खन्ना

VIDEO : सोनाली कुलकर्णीच्या ‘गुलाबजाम’ची रेसिपी पाहिलीत का?

मी तिची माफीही मागितली होती, लैंगिक शोषणाच्या आरोपांविषयी अजीजचे स्पष्टीकरण

गर्लफ्रेंड लुलियामुळे सलमान पुन्हा एकदा ट्रोल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 8:44 am

Web Title: top 10 news salman khans marathi bigg boss announcement to gulabjaam movie teaser bollywood marathi gossip news
Next Stories
1 राज कपूर सामाजिक जाणिवा समृद्ध असलेले दिग्दर्शक!
2 ‘पद्मावत’मुळे ‘पॅडमॅन’च्या कमाईत होणार इतकी घट?
3 शिवला लागलं बानूचं याड?
Just Now!
X