News Flash

डॉल्फिनसोबत फोटो काढणं त्रिशाला पडलं महाग

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या त्रिशा कृष्णने बॉलिवूडमध्येही काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

तृषा कृष्णन

चित्रपटसृष्टी हे असं एक क्षेत्रं आहे जिथे तुमच्या नशीबामुळे आणि चाहत्यांच्या प्रेममामुळे प्रसिद्धीचं सुख अनुभवता येत असतं. रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या कलाकारांचे असंख्य चाहते असतात. कलाकारांचे हेच चाहते त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचवतात तर काहीवेळी आवडत्या कलाकाराने केलेल्या चुकीवर त्याला खडे बोल सुनवतात. अशीच वेळ सध्या अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर आली असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केल्याचं समोर आलं आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या त्रिशा कृष्णने बॉलिवूडमध्येही काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिचा बराच मोठा फॅनफॉलोअर आहे. याच चाहत्यांच्या भेटीसाठी त्रिशा अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो शेअर करत असते. असाच एक फोटो त्रिशाने शेअर केला. या फोटोमध्ये तिच्यासोबत डॉल्फिन मासा दिसून येत आहे. त्यामुळे ती सध्या ट्रोल झाली आहे.

त्रिशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्याबरोबर एक डॉल्फिन मासा दिसत असून ती त्याच्यासोबत खेळताना दिसत आहे. मात्र हा फोटो नेटकऱ्यांना पसंत न पडल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी तिला खडे बोल सुनावले असून मुक्या प्राण्यांबरोबर कसं वागावं हेदेखील कळत नाही का ? असा जाब विचारला आहे. तर काहींनी तिला युनिसेफची सदिच्छादूत असल्याचा विसर पडला आहे का ? असा प्रश्नही विचारला आहे.

दरम्यान, डॉल्फिनची जागा मत्स्यालयात आहे. कोणत्याही स्विमिंगपूलमध्ये नाही, असंही काही ट्रोलकऱ्यांनी म्हटलं आहे. या साऱ्यांवर त्रिशाने अद्यापतरी कोणतही उत्तर दिलेलं नाही. त्रिशा कृष्णन दाक्षिणात्य चित्रपटांमधील एक नावाजलेलं नाव असून तिने बॉलिवूडमधील ‘खट्टा-मीठा’ या चित्रपटामध्ये अक्षयकुमारसह स्क्रिन शेअर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 1:19 pm

Web Title: trisha krishnan gets trolled for posting photo with dolphin people shocking comments
Next Stories
1 ..म्हणून वडिलांनाही वेळ देऊ शकत नाही जान्हवी
2 Video : ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील बिग बींचा लूक पाहिलात का?
3 पहिल्यांदाच एकत्र झळणार सुमित -मृणालची जोडी
Just Now!
X