झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. वय विसरायला लावणाऱ्या या प्रेम कहाणीने टीआरपीच्या यादीतही बाजी मारली आहे. ईशा निमकर आणि विक्रम सरंजामे यांची प्रेमकथा आणि मालिकेत दररोज नव्यानं येणारं वळण प्रेक्षकांना खिळवून ठेवते. आता त्यात ‘जब वी मेट’ या हिंदी चित्रपटाचंही कनेक्शन पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहिद कपूर आणि करिना कपूर खान यांच्या ‘जब वी मेट’ चित्रपटाच्या कथेशी मिळतीजुळती कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या आगामी भागात इशा आणि विक्रम अनपेक्षितपणे रोड ट्रीपला जातात आणि ही ट्रीप दोघांसाठी मजेशीर ठरते. या ट्रीपमुळे हे दोघं एकमेकांच्या आणखी जवळ येतात. ‘जब वी मेट’ चित्रपटात ज्याप्रकारे गीत (करिना) आणि आदित्य (शाहिद) अचानकपणे भेटतात आणि पुढचा प्रवास एकत्र करतात त्याचप्रमाणे ‘तुला पाहते रे’ मालिकेतील ईशा आणि विक्रम भेटणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula pahare re marathi serial to feature a jab we met track soon subodh bhave gayatri datar
First published on: 20-10-2018 at 17:32 IST