News Flash

“स्टारकिडसाठी मला सिनेमातून काढून टाकलं”; ‘तुंबाड’ फेम अभिनेत्रीचा खुलासा

बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद अजूनही शमला नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरु झालेला बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद अजूनही शमला नाही. अनेक मोठमोठे कलाकार आता या मुद्द्यावर मनमोकळेपणाने बोलू लागले आहेत. ‘तुम्बाड’, ‘सिम्बा’, ‘आर्टिकल १५’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री रोंजिनी चक्रवर्ती हिलासुद्धा घराणेशाहीचा सामना करावा लागला होता. स्टारकिडला चित्रपटात घेण्यासाठी तिला काढून टाकण्यात आलं होतं, असा खुलासा रोंजिनीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रोंजिनी म्हणाली, “हे अनेकदा घडतं. एका स्टारकिडला चित्रपटात घेण्यासाठी मला काढून टाकण्यात आलं होतं. त्यांना ओळखीचा चेहरा हवा होता. मला असं वाटतं की हे प्रत्येक क्षेत्रात होतं आणि इंडस्ट्रीत सर्वाधिक घडताना दिसतं. अधिकाधिक मेहनत करून पुढे जाणे हाच एकमेव पर्याय असतो. मी प्रेक्षकांना अधिक महत्त्व देते. माझ्या अभिनयाने त्यांच्याशी जोडून राहण्याचा प्रयत्न करते. प्रेक्षकांनी त्यांचे ५०० रुपये माझं अभिनय पाहण्यासाठी खर्च करावं, यासाठी मला तेवढ्या ताकदीची अभिनेत्री व्हावं लागेल.”

रोंजिनीने २०१२ मध्ये ‘सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’ या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. तिने ‘सिम्बा’ आणि ‘आर्टिकल १५’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत ‘रक्तांचल’ आणि ‘लाल बाजार’ या वेब सीरिजमधल्या तिच्या अभिनयानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. रोंजिनी लवकरच ‘रक्तांचल’च्या दुसऱ्या सिझनमध्ये झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 12:36 pm

Web Title: tumbbad actress ronjini chakraborty says she has been replaced by a star kid ssv 92
Next Stories
1 परदेशातही सोनू सूदचे ‘मिशन घर भेजो’; ‘या’ देशातून भारतीयांना आणणार मायदेशी
2 ‘K.G.F 2’मधील संजय दत्तचा फर्स्ट लूक येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
3 फ्रीमध्ये परफॉर्म केल्यास अवॉर्ड देण्याची दिली होती ऑफर- अदनान सामी
Just Now!
X