करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाउन पाळण्यात येत आहे. त्यामुळे घरात राहून नागरिकांचं मनोरंजन व्हावं यासाठी दूरदर्शनवर महाभारत आणि रामायण या ९० च्या दशकातील मालिका पुन्हा सुरु केल्या आहेत.त्यामुळे सध्या सोशल मीडियावरही या मालिकांचा ट्रेंड सुरु असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या मालिकांसोबतच ९० च्या दशकात गाजलेल्या काही जाहिरातीही ट्रेंड होऊ लागल्या आहेत. चला तर मग पाहुयात ९० च्या दशकातील लोकप्रिय जाहिराती.-

१. वॉशिंग पावडर निरमा-
हेमा, रेखा, जया और सुषमा..सबकी पसंद निरमा ही गाण्याची ओळ आजही अनेकांच्या ओठी ऐकायला मिळते. त्याकाळी ही जाहिरात प्रचंड लोकप्रिय झाली होती. या एका टॅगलाइनने स्त्री वर्गाचं लक्ष वेधून घेतलं होतं.

२. नेरोलॅक –
जब घर की रौनक बढानी हो, दीवारों को जब सजाना हो..नेरोलॅक,नेरोलॅक ही जाहिरात म्हटलं की डोळ्यासमोर रंगांनी न्हाऊन गेलेलं घर यायचं. ही देखील त्याकाळातील लोकप्रिय जाहिरात होती.

३. हमारा बजाज-
बजाज या कंपनीवर आजही अनेक जण डोळे झाकून विश्वास ठेवतात. या कंपनीची हमारा बजाज हे गाणं १९८९ मध्ये रिलीज झालं होतं.

४.विको टर्मरिक-
विको टर्मरिक ही क्रिम आजही महिलावर्गामध्ये लोकप्रिय आहे. या कंपनीची जाहिरात आजही तितकीच लोकप्रिय आहे.मात्र कलानुरुप या जाहिरातींमध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळतं.

५.अॅक्शन का स्कूल टाइम-
शाळेत जायचं असेल तर शूट हे हवेच. त्यामुळे लहान मुलांना खास आकर्षित करण्यासाठी ही जाहिरात करण्यात आली होती.

६. बादशाह मसाला-
स्वाद सुगंध का राजा, बादशाह मसाला’ ही जाहिरातही महिला वर्गामध्ये लोकप्रिय होती.

७. अमूल दूध-
अमूल या कंपनीच्या प्रत्येक जाहिरातीमध्ये काही ना काही तरी खास असतं. त्यामुळे त्यांची प्रत्येक जाहिरात गाजते. ९० च्या दशकातही अमूल दूध है वंडरफूल ही जाहिरात गाजली होती.

८. धारा घी –
या जाहिरातीलमधील लहान मुलांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

९. झंडू बाम-
झंडू बाम..झंडू बाम..पिडा हरी बाम..ही जाहिरात आज दाखवत नसले तरीदेखील लोकप्रिय आहे.

 

१०. सन ड्रॉप ऑइल –
ही जाहिरातही लोकप्रिय झाली होती.

या जाहिरातींप्रमाणेच अशा अनेक जाहिरातील आहेत ज्या त्याकाळी तुफान लोकप्रिय झाल्या होत्या. यात नाईल शॅम्पू, कॅडबरी डेरीमिल्क या जाहिरातींचा समावेश आहे.