26 February 2021

News Flash

चित्रपटातील धोनीपेक्षा खरा धोनी खूपच चांगला दिसतो- रजत कपूर

सुशांतसिंग राजपूतला मात्र आपल्या चाहत्यांची यादी फारशी मोठी नाही असेच वाटत आहे.

सुशांतसिंग राजपूत, रजत कपूर

‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी सध्या अभिनेता सुशांतसिंग राजपूतची सर्वच स्तरांतून प्रशंसा होत आहे. भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनातील आतापर्यंतच्या महत्त्वाच्या प्रसंगाांवर आणि माहीच्या जीवनप्रवासावर या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. पण, अनेकांकडून प्रशंसेस पात्र असणाऱ्या सुशांतसिंग राजपूतला मात्र आपल्या चाहत्यांची यादी फारशी मोठी नाही असेच वाटत आहे.

अभिनेता रजत कपूरसोबत झालेल्या ट्विटर वॉरमध्ये त्याने असेच म्हटले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेता रजत कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन चित्रपटाबाबतची त्यांची प्रतिक्रिया दिली. ‘या चित्रपटात धोनीचे पात्र साकारलेल्या अभिनेत्यापेक्षा खरा धोनी खूपच चांगला दिसतो’, असे ट्विट त्यांनी केले होते. रजत यांच्या या ट्विटला उत्तर देताना केलेल्या ट्विटमध्ये ‘माझ्या मध्ये अालेल्या काही त्रुटी भरुन काढण्यासाठी मी फार मेहनत घेतली आहे. तुम्हाला जर ते पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही कृपया हा चित्रपट पाहा’, असे सुशांत म्हणाला.

फवाद खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘कपूर्स अॅण्ड सन्स’ या चित्रपटामध्ये रजतने त्यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. सुशांतच्या या ट्विटनंतर काही टिकांचा मारा झाल्यावर रजत यांनी पुन्हा एक ट्विट केले. ‘मला या चित्रपटातील तुझी भूमिका फारच आवडली आहे. तुझ्या चाहत्यांची संख्याही फार आहे. माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा सुशांत’, असे रजत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले होते. रजतच्या या पलटवारानंतर सुशांतनेही त्यांच्या ट्विटला उत्तर दिले. ‘ते माझे चाहते नाहीत. मला जास्त चाहते नाहीत. प्रेक्षकांना फक्त चांगले चित्रपट आवडतात. तुमचा ‘कपूर्स अॅण्ड सन्स’ हा चित्रपटही खूप चांगला होता.

रजत यांच्या या ट्विटमुळे त्यांच्यावर अनेकांनी टिकेची झोड उठवली आहे. प्रदर्शनानंतर ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने चांगलीच कमाई करत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. विविध चित्रपट समीक्षकांनीही या चित्रपटातीस सुशांतसिंग राजपूतच्या भूमिकेची प्रशंसा केली आहे.

1 2 3 4 5

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 4:51 pm

Web Title: twitter war between rajat kapoor and sushant singh rajput
Next Stories
1 राज कपूर यांच्या ‘आवारा’ या चित्रपटामुळे भारत आणि चीनदरम्यान झाला करार
2 पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित होणे ‘मुश्कील’
3 प्रियांकाच्या नकाराने उर्वशीचा फायदा!
Just Now!
X