काही दिवसांपूर्वी, हॉरर-कॉमेडी ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते आणि त्या हटके पोस्टरमुळे सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली. पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेले झोंबी आणि त्याविषयीची कथा याची उत्सुकता देखील वाढली होती. आता प्रेक्षकांना झोंबीची छोटीशी झलक पाहायला मिळणार आहे. कारण ‘झोंबिवली’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी हिंदी आणि इंग्रजी सिनेमात झोंबीज पाहिले आहेत, पण ‘झोंबिवली’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीमध्ये पण आता झोंबीज् पाहायला मिळणार आहेत.

मोशन पोस्टर हे सिनेमाप्रती उत्सुकता वाढवणार यात शंका नाही. झोंबींचे व्हिज्युअल, सुप्रसिध्द संगीतकार ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिलेले बॅकग्राऊंड म्युझिक, एकंदरीत मोशन पोस्टरचा इफेक्ट या सर्व गोष्टींनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

सारेगम प्रस्तुत ‘झोंबिवली’ चित्रपटाची निर्मिती Yoodlee Films यांनी केली आहे. तर सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.