करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. परंतु या विषाणूला रोखण्यासाठी अद्याप कुठलीही अधिकृत लस तयार झालेली नाही. या पार्श्वभूमीवर डॉक्टर्स आणि वैद्यकिय तज्ज्ञ करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र तरीही काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. या मंडळींना मास्कचं महत्व पटवून देण्यासाठी काश्मिरमधील एका वर्तमानपत्राने अनोखी कल्पना लढवली आहे. त्यांनी वर्तमानपत्रासोबत फ्री मास्कचं वाटप केलं आहे.

अवश्य पाहा – विद्युत जामवालने वाढवला देशाचा मान; व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ‘या’ यादीत मिळवलं स्थान

अवश्य पाहा – ‘जय महाराष्ट्र’ म्हणत अमेरिकेतील डॉक्टर करतोय रुग्णांची सेवा; अवधूत गुप्तेने केलं कौतुक

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी ट्विट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. या वर्तमानपत्राचं नाव रोशनी असं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या वर्तमानपत्राची किंमत केवळ दोन रुपये आहे. मात्र तरीही त्यांनी मास्कबाबत जागृकता पसरवण्यासाठी वर्तमानपत्रासोबत मास्कचं वाटप केलं. त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियद्वारे कौतुक केलं जात आहे.

करोनाबाधित रुग्णसंख्येने ओलांडला ११ लाखांचा टप्पा

भारतात करोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच दिवसभरात इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासांत देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे करोनाबाधित आढळले असून, ६८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ११ लाख १८ हजार ०४३ वर पोहचली आहे. ३ लाख ९० हजार ४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर आतापर्यंत सात लाखांपेक्षा जास्त जणांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत २७ हजार ४९७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.