अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर-कोठारे लवकरच रुपेरी पडद्यावर तिच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा एका वेगळ्या भूमिकेत आणि लुकमध्ये दिसणार आहे. प्रेक्षकांना ऊर्मिलाचा हा लुक आगामी ‘गुरू’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री प्रेक्षकांना ठरावीक भूमिकेत आणि वेशभूषेत पाहायची सवय झालेली असते. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका किंवा चित्रपटातूनही ऊर्मिला हिला प्रेक्षकांनी साध्या रूपातच पाहिले आहे. ‘दुनियादारी’ चित्रपटातील ‘मिनू’ तशाच प्रकारची होती. ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’मध्ये ऊर्मिला वेगळ्या व ‘टॉमबॉईश’ लुकमध्ये पाहायला मिळाली होती. आता आगामी ‘गुरू’मध्येही ती वेगळ्या रूपात दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांचे असून ‘गुरू’मध्ये ऊर्मिलाची फक्त वेगळी भूमिकाच नाही तर तिचा ‘मेकओव्हर’ करण्यात आला आहे. एका भन्नाट रूपात ती प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटात ती ‘मँगो डॉली’ ही व्यक्तिरेखा साकारत असून तिचा लुक आणि वेशभूषाही एकदम वेगळी आहे. ग्रामीण बोलीतील संवाद तिला देण्यात आले आहेत. ऊर्मिलाने आजवर साकारलेल्या एका ठरावीक चाकोरीतील भूमिकेपेक्षा वेगळी असलेली ही भूमिका तिला नवी ओळख मिळवून देईल का? याबाबत प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Dec 2015 रोजी प्रकाशित
ऊर्मिला कानेटकर वेगळ्या भूमिकेत
अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर-कोठारे लवकरच रुपेरी पडद्यावर तिच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा एका वेगळ्या भूमिकेत
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 09-12-2015 at 08:44 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urmila kanetkar new look in guru