News Flash

लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचं होणार मनोरंजन; पाहा उर्वशीचं नवं आयटम साँग

'कंगना विलायती' गाण्याचा व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. लॉकडाउनमुळे त्रस्त झालेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी उर्वशीचं एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘कंगना विलायती’ असं या गाण्याचं नाव आहे. गाणं प्रदर्शित होताच ते पाहण्यासाठी सोशल मीडियावर अक्षरश: झुंबड उडाली आहे.

असं काय आहे या गाण्यामध्ये?

उर्वशी रौतेला या गाण्यामध्ये जबरदस्त नृत्याचे प्रदर्शन करताना दिसत आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन या गाण्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. रामजी गुलाटी यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तसंच गायिका ज्योतिका टंगरी हिने गाणं गायलं आहे. कुमार अरेंजर यांनी गाणं लिहिलं आहे. ‘कंगना विलायती’ हे गाणं शुक्रवारी रात्री युट्युबर प्रदर्शित झालं होतं. काही तासांत शेकडो वेळा हे गाणं पाहिलं गेलं आहे.

 

View this post on Instagram

 

#KANGNAVILAYATI OUT NOW . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #love #UrvashiRautela

A post shared by URVASHI RAUTELA Actor (@urvashirautela) on

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन जारी करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे मनोरंजन क्षेत्र पार ठप्पच पडलं आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म वगळता कुठलाही नवा चित्रपट, मालिका, नाटक वगैरे प्रदर्शित झालेले नाही. या पार्श्वभूमीवर उर्वशीच्या या नव्या गाण्याची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 4:19 pm

Web Title: urvashi rautela new song kangna vilayati mppg 94
Next Stories
1 मालिकेतील ‘रावण’ खऱ्या आयुष्यात असतात रामभक्तीत लीन; ‘रामायण’ पाहून म्हणाले…
2 ‘मुळशी पॅटर्न’च्या हिरोंचा तमाशा कलावंतांना मदतीचा हात
3 ‘२१ दुणे ४२’मध्ये आज अविनाश-ऐश्वर्या नारकर व शिरीष लाटकर करणार कथांचं अभिवाचन
Just Now!
X