03 March 2021

News Flash

तू मुस्लिम धर्म स्वीकारलास का? नेटकऱ्यांनी केलं उर्वशी रौतेलाला ट्रोल

काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिने एक फोटो शेअर केला होता

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. आपल्या मादक अदांनी घायाळ करणारी उर्वशी सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असते. कायम चर्चेत येणाऱ्या उर्वशीला मात्र एक फोटोमुळे ट्रोल व्हावं लागलं आहे.

उर्वशीने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती एका मशीदमध्ये उभी असल्याचं दिसून येत आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

उर्वशीने शेअर केलेला फोटो अबुधाबीमधील एका मशिदीमधील असून यात तिने बुरखा घातल्याचं दिसून येत आहे. तिचा हा पेहराव पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर ताशेरे ओढत, ‘तू मुस्लिम धर्म स्वीकारलास का?’ असा प्रश्न विचारला आहे.

‘एक हिंदू असून तू मुस्लिमांच्या वेशात काय करत आहेस?’ असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर, ‘तुला मुस्लिम धर्म स्वीकारायची हौस आहे का?’, ‘थोडी तरी लाज बाळग’, ‘कधीतरी मंदिरातही जात जा’, असं म्हणतं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

वाचा : कोई मिल गया: ‘जादू’च्या मुखवट्यामागील खरा चेहरा

दरम्यान, उर्वशी कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. गेल्या काही काळापूर्वी ती भारतीय क्रिकेट खेळाडू हार्दिक पांड्यामुळे चर्चेत आली होती. उर्वशी आणि हार्दिक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा त्यावेळी प्रचंड रंगल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:45 pm

Web Title: urvashi rautela photo outside sheikh zayed grand mosque abu dhabi troll ssj 93
Next Stories
1 ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या जागी येणार ‘ही’ मालिका
2 ‘ही’ चिमुकली आहे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी
3 जिव्हारी लागणारी थप्पड
Just Now!
X