02 March 2021

News Flash

‘बेफिक्रे’तील वाणीच्या हनुवटीवर ट्विटरकरांनी साधला निशाणा..

वाणीची तुलना अभिनेत्री कतरिना कैफशीसुद्धा केली गेली आहे.

नुकताच अभिनेता रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. रोमॅन्टिक ड्रामा प्रकारात येणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. या ट्रेलरमधील रणवीरच्या भूमिकेला रसिकांनी पसंत केले असले तरीही वाणी कपूरच्या लूकविषयी मात्र सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.

हल्लीच्या जाणकार प्रेक्षकांनी वाणीच्या बोलण्याच्या अंदाजावर आणि तिच्या हनुवटीवर टिका केली आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातील वाणीचा लूक, तिची एकंदर चेहरेपट्टी आणि सध्या ‘बेफिक्रे’मधील तिचा लूक पाहता अनेक चर्चांना उधाण आले आहे. वाणीने तिच्या हनुवटीची कॉस्मेस्टिक सर्जरी करुन घेतली असल्याची सध्या चर्चा आहे. या सर्जरीमुळे तिच्या चेहऱ्यातील फरक प्रेक्षकांनी लगेचच हेरला आहे. ‘बेफिक्रे’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्येच ट्विटरद्वारे वाणी कपूरच्या नावे एक हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला होता. ज्यामध्ये अनेकांनी वाणीच्या बोलण्याच्या अंदाजाची आणि तिच्या हनुवटीची खिल्ली उडवली होती. कॉस्मेस्टिक सर्जरीमुळे काही जणांनी तर वाणीची तुलना अभिनेत्री कतरिना कैफशी सुद्धा केली.

दरम्यान ‘बेफिक्रे’चा ट्रेलर विविध कारणांमुळे चर्चेत आहे असेच म्हणावे लागेल. यशराज फिल्म्सच्या निर्मितीत साकारलेल्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटाच्या निमित्ताने आदित्य चोप्रा पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे साचेबद्ध प्रेमकहाणीच्या चौकटीपलीकडे जात त्यांचा हा चित्रपट रसिकांवर कितपत भुरळ पाडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ९ डिसेंबरला रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा बहुचर्चित ‘बेफिक्रे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 11:49 am

Web Title: vaani kapoor trolled on twitter in befikre victim of plastic surgery
Next Stories
1 Big Boss 10: अभिनयाची आवड असणारा ‘बिग बॉस’चा खास पाहुणा
2 मायकल जॅक्सन अजूनही ‘फोर्ब्स’च्या यादीत नंबर वन
3 फ्लॅशबॅक : चित्रपटगृह डेकोरेशनचे आकर्षण
Just Now!
X