09 March 2021

News Flash

चोरालाच भाऊ मानत वैजू मागणार चोरी न करण्याची ओवाळणी

‘वैजू नंबर वन’ मालिकेत रक्षाबंधन विशेष भाग पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘वैजू नंबर वन’ मालिकेत रक्षाबंधन विशेष भाग पाहायला मिळणार आहे. प्रत्येक समस्येवर हटके उपाय शोधणाऱ्या वैजूला मालिकेत भाऊ नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी तिला याची उणीव भासत असते आणि ती देवाला मला भाऊ मिळावा अशी प्रार्थना करते. योगायोगाने रक्षाबंधनाच्या दिवशी वैजूच्या घरात एक चोर घुसतो आणि देवाने कौल दिला या आनंदात वैजू या चोरालाच आपला भाऊ मानून त्याला ओवाळते.

तिसरी मंझिलच्या चाळकऱ्यांच्या लक्षात जेव्हा ही गोष्ट येते तेव्हा नेमका काय गोंधळ उडतो आणि वैजू यातून कसा मार्ग काढते याची मजेशीर गोष्ट ‘वैजू नंबर वन’च्या रक्षाबंधन विशेष भागात पाहायला मिळणार आहे.

‘वैजू नंबर वन’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्याच्या तणावाच्या या वातावरणात मालिकेतले हलकेफुलके विनोद प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळवत आहेत. तिसरी मंझिल चाळीतलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलसं वाटू लागलं आहे. त्यामुळेच ‘वैजू नंबर वन’च्या प्रत्येक भागात कोणती नवी धमाल घडणार याची उत्सुकता असते. सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका प्रसारित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 3:59 pm

Web Title: vaiju number 1 marathi serial raksha bandhan special episode ssv 92
Next Stories
1 सोनू सूदची आसाममधील ‘त्या’ महिलेला रक्षाबंधनाची खास भेट
2 सुशांतच्या एक्स मॅनेजरच्या पार्टीत राजकीय नेते उपस्थित होते का? मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले..
3 प्रियांकाच्या ‘या’ ड्रेसची किंमत माहित आहे का?
Just Now!
X