20 February 2019

News Flash

‘हृदयात वाजे समथिंग’द्वारे साजरा करा प्रेमाचा सीझन

फेब्रुवारी म्हणजे प्रेम आणि रोमान्सचा महिना असतो.

वैभव तत्ववादी

फेब्रुवारी म्हणजे प्रेम आणि रोमान्सचा महिना आणि हा प्रेमाचा सोहळा झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांसोबत साजरा करणार आहे. ११ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही वाहिनी आपल्या प्रेक्षकांचा व्हॅलेंटाइन डे अधिक खास करण्यासाठी ‘हृदयात वाजे समथिंग’ कार्यक्रम घेऊन येत आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीत आणि उत्साही प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेला, दमदार डान्स परफॉर्मन्सेस, खळखळून हसवणारे विनोदी स्किट्स आणि धमाकेदार गायकांची अप्रतिम गाणी अर्थात मनोरंजनाने परिपूर्ण असलेला ‘हृदयात वाजे समथिंग’ हा कार्यक्रम ११ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता झी टॉकिजवर प्रसारित होईल.

वाचा : ‘पॅडमॅन चॅलेंज’वर मल्लिका दुआने ओढले ताशेरे

सिनेकलाकारांच्या दमदार परफॉर्मन्सेसनी या कार्यक्रमाला चार चांद लावलेत तसेच या खास कार्यक्रमाच्या उत्साहात भर घातली ती म्हणजे अभिनेता वैभव तत्ववादीने. या कार्यक्रमात तो लोकप्रिय सिनेमा सैराट मधील गाण्यांवर टॅलेंटेड डान्सर मीरा जोशीसोबत परफॉर्म करणार आहे. या सीझनची थीम रोमान्स असून मयुरेश पेम आणि माधवी नेमकर टाइमपास सिनेमातील ‘दाटले रेशमी’ या प्रसिद्ध रोमँटिक गाण्यावर परफॉर्म करणार आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली इंडस्ट्रीतील हास्यसम्राट व्यक्तीमत्व -नम्रता आवटे आणि प्रियदर्शन जाधव यांनी. फक्त एवढेच नाही! योगेश शिरसाट, सुहास परांजपे, आरती सोळंकी आणि समीर चौगुले हे विनोदवीर त्यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांना मनोरंजित करणार आहेत. संगीत, लावणी, कथक आणि बहु-सांस्कृतिक परफॉर्मन्सेस आणि बरेच काही ‘हृदयात वाजे समथिंग’ द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वाचा : ‘बीच वेडिंग’साठी रणवीर- दीपिका सज्ज?

कोल्हापूरकरांसमोर परफॉर्म करण्याविषयी वैभव तत्ववादी म्हणाला की, ‘फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आहे आणि अशा खास व विलक्षण उत्सवात सामील होण्याचा मला अतिशय आनंद आहे. व्हॅलेंटाइन डे आता अगदी जवळ आला असताना, आम्ही सैराटमधील प्रेक्षकांना आवडणारी प्रेमाची गाणी निवडली आहेत. माझ्या परफॉर्मन्स शिवाय या शोमध्ये अजूनही बरेच असे काही आहे की त्यामुळे तुम्ही हा व्हॅलेंटाइन सीझन आमच्या सोबतच साजरा कराल!’

First Published on February 9, 2018 3:12 pm

Web Title: valentines day special hridyat vaje something show on zee talkies