25 February 2021

News Flash

Video : …आणि रिअॅलिटी शोमधील ‘त्या’ टास्कमुळे शाहरुख भडकला

शो सोडून तडक गेला निघून

शाहरुख खान (संग्रहीत छायाचित्र)

बॉलिवूडचा बाहशहा शाहरुख खान नुकताच एका रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. हा रिअॅलिटी शो अरबी देशांत अतिशय प्रसिद्ध असून काहीवेळा तो वादग्रस्तही ठरला आहे. अनेक अरब देशांतील सेलिब्रिटींचा सहभाग असणाऱ्या या शोमध्ये शाहरुख पाहुणा कलाकार म्हणून उपस्थित होता. मात्र शोच्या टास्कमुळे शाहरुख आयोजकांवर भलताच भडकला आणि तडक निघून गेला.

शाहरुख सहभागी झालेल्या या अॅपिसोडचे शूटींग अतिशय दुर्गम भागात होते. अबू धाबी येथे असणाऱ्या निर्जन स्थळावर शोच्या शूटींगसाठी शाहरुख हेलिकॉप्टरने पोहचला देखील. त्यानंतर त्याला उंटावरुन पुढे वाळवंटात नेण्यात आले. शोच्या आयोजकांनी शाहरुखचे याठिकाणी उत्तमपद्धतीने स्वागतही केले. मात्र या शोमध्ये देण्यात आलेल्या टास्कमुळे शाहरुख अॅंकरवर आणि आयोजकांवर भलताच भडकला.

शोमधील दोन स्पर्धकांसोबत शाहरुखला गाडीने वाळवंटात नेण्यात आले. गाडीचा चालक अचानक गायब झाला. त्यावेळी शाहरुख आणि इतर दोन स्पर्धक गाडीतून बाहेर पडले आणि याठिकाणच्या दलदलीत फसले. यातील एका स्पर्धकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक एक भयंकर प्राणी या तिघांच्या दिशेने यायला लागला. याठिकाणी त्यामुळे शाहरुखसह इतर दोघेही भलतेच घाबरले होते.

काही वेळाने हा प्राणी खरा नसून तो खोटा होता आणि अशाप्रकारे केलेल्या खोड्या हा शोचाच एक भाग होता हे कळाल्यावर शाहरुख त्या अॅंकरवर भलताच भडकला. दलदलीतून या तिघांना बाहेर काढल्यानंतर शाहरुख या अॅंकरला जवळपास मारायलाच धावल्याचे या व्हीडिओमध्ये दिसत आहे. मी भारतातून हे असले प्रकार करण्यासाठी इथे आलो का असा प्रश्नही शाहरुखने त्याला केला. झाल्या प्रकाराबद्दल अॅंकरने अनेकदा शाहरुखची माफीही मागितली. मात्र आपल्याशी अशाप्रकारे वर्तन केल्याबद्दल चिडलेला शाहरुख या ठिकाणहून तडक निघून गेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 1:18 pm

Web Title: video shahrukh khan participated in arab reality show got angry
Next Stories
1 अभिनेत्री नूतन यांना गूगल डूडलची मानवंदना
2 ‘जस्टिस लीग’चे आव्हान
3 दुसरा ‘अवतार’ लांबणीवर
Just Now!
X