News Flash

मुस्लिम असल्यामुळे भरतनाट्यम शिकवण्यास गुरुजींनी दिला होता नकार, वहीदा रहमान यांचा खुलासा

त्यांनी एका शोमध्ये हा खुलासा केला आहे.

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वहीदा रहमान. वहीदा यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीमधून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदी, तामिळ, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. त्यावेळी वहीदा यांचे लाखो चाहते होते. अनेक दिग्दर्शकांना त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. आज वहीदा या लाइमलाइटपासून लांब असल्या तरी त्यांचे चाहते असल्याचे पहायला मिळते. नुकताच वहीदा यांनी ‘डांस दीवाने ३’ या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी भरतनाट्यम शिकवणाऱ्या गुरुजींनी त्यांचा धर्म पाहून नकार दिल्याचे सांगितले आहे.

वहीदा यांनी हा किस्सा सांगताना म्हटले की, ‘जेव्हा मी चैन्नईमध्ये राहत होते तेव्हा मला भरतनाट्यम शिकण्याची इच्छा होती. त्यासाठी मी त्यावेळी प्रसिद्ध असणाऱ्या गुरुजींकडे गेले होते. मी माझ्या मैत्रीणीला म्हटले की जर मी भरतनाट्यम शिकले तर या गुरुजींकडूनच शिकेन. पण गुरुजी म्हणाले मी या मुलीला शिकवू शकत नाही कारण ती मुस्लिम आहे. जेव्हा मी हट्ट केला की मला त्यांच्याकडेच शिकायचं आहे तेव्हा त्यांनी माझी कुंडली मागितली. पण ती माझ्याकडे नव्हती कारण आमच्या धर्मात असं काही बनवत नाहीत.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Waheeda Rehman (@waheedaxrehman)

पुढे त्या म्हणाल्या, ‘त्यानंतर गुरुजींनी माझी जन्मतारीख मागवली आणि माझी कुंडली तयार केली. ती पाहून ते आश्चर्यचकित झाले. कारण त्या गुंडलीनुसार मी त्यांची सर्वात चांगली आणि उत्तम शिष्या ठरणार होते.’

वहीदा यांना त्या गुरुंनी नंतर भरतनाट्यम शिकवण्यास सुरुवात केली. त्यांच्या करिअरमध्ये त्या उत्तम डान्सर म्हणून देखील ओळखल्या जात होत्या. ‘डांस दीवाने ३’मध्ये वहीदा यांनी माधुरी दीक्षितसोबत ‘पान खाए सैंया हमारे’ या गाण्यावर डान्स केला होता. त्या दोघींचा व्हिडीओ चर्चेत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 11:23 am

Web Title: waheeda rehman speak about she had to make kundali for bharatnatyam guru avb 95
Next Stories
1 खऱ्या पुरुषाने काय करायला हवं?; सनी लिओनी म्हणाली…
2 Holi 2021: ‘रंग बरसे’ ते ‘बलम पिचकारी’, रंगाची उधळण करताना बेभान करणारी गाणी
3 ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील लतिकाचा ‘वाथी कमिंग’ डान्स पाहिलात का? व्हिडीओ चर्चेत
Just Now!
X