20 February 2019

News Flash

Ladki mil gayi : सलमानच्या नव्या अभिनेत्रीला ‘डेअरी मिल्क’ ठरली लकी?

वर्षभरापूर्वी तिनं सहज पोस्ट टाकली होती

आयुष शर्मा याची मुख्य भूमिका असलेल्या 'लव्हरात्री' या चित्रपटात वरिना हुसेन मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘मुझे लडकी मिल गयी’ सलमान खाननं केलेल्या या एका ट्विटनं सोशल मीडियावर काल अक्षरश: धुमाकूळ घातला. नेहमीप्रमाणे हटके स्टाईलनं ट्विट करत आपल्या नव्या अभिनेत्रीला सलमाननं जगासमोर आणलं आणि सगळ्यांना चर्चेचा विषय दिला. सुरूवातीला तर अनेकांना सलमानला लग्नासाठी मुलगी मिळाली की काय असंच वाटलं होतं पण नंतर मात्र आगमी चित्रपट ‘लव्हरात्री’साठी ‘लडकी मिल गयी’ असं ट्विट सलमाननं केलं असल्याचं सगळ्यांना लक्षात आलं आणि ही चर्चा काहीशी थांबली. या अभिनेत्रीचं नाव आहे वरिना हुसेन, आयुष शर्मासोबत ती लव्हरात्री या चित्रपटात दिसणार आहे.

विशेष म्हणजे वरिनाचा बॉलिवूडमधल्या एण्ट्रीचा ‘पासवर्ड’ हे डेअरी मिल्क चॉकलेटच आहे असं अनेक जण मानतात. गेल्यावर्षी वरिना कॅडबरी डेरी मिल्कच्या एका जाहिरातीत दिसली होती. तिने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. ‘दिशा पटानीने सिल्कची जाहिरात केली होती तेव्हा या जाहिरातीनंतर तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आता तू ही जाहिरात केली म्हटल्यावर तुलाही कदाचित बॉलिवूडमध्ये यायची संधी मिळेल अशी कॉमेंट एका युजरनं केली होती. सप्टेंबरमध्ये तिनं ही जाहिरात आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली होती आणि काय आश्चर्य एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत तिच्यासाठी बॉलिवूडचे दार खुले झाले. त्यामुळे तिच्यासाठी बॉलिवूडचे दार खुले व्हायला सिल्क लकी ठरेल अशी तिच्या चाहत्यानं वर्षभरापूर्वी वर्तवलेली शक्यता तंतोतंत खरी ठरली.

सलमानची बहीण अर्पिता खान शर्माचा पती आयुष शर्मा याची मुख्य भूमिका असलेला ‘लव्हरात्री’ हा चित्रपट येत आहे त्यात वरिना हुसेन ही मुख्य भूमिकेत असणार आहे. वरिनाने न्यूयॉर्क फिल्म अॅकाडमीमधून अभिनयाचे धडे घेतले आहे.

First Published on February 7, 2018 12:41 pm

Web Title: warina hussain appeared in the cadbury dairy milk silk commercial