19 September 2020

News Flash

Video : असा साकारला ‘मुन्ना भाई’चा लूक

मुन्ना भाईसाठीच रणबीरला जवळपास १३- १५ लूक टेस्ट द्यावे लागले होते.

रणबीर कपूर, संजय दत्त

हुबेहूब अभिनेता संजय दत्तला रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी रणबीर कपूरने बरीच मेहनत घेतली. जवळपास दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर जेव्हा ‘संजू’ प्रदर्शित झाला तेव्हा रणबीरला पाहून सर्वच जण थक्क झाले. चित्रपटात रणबीरने मुन्ना भाईची भूमिकासुद्धा साकारली आहे. ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चित्रपटातील दृश्य पुन्हा एकदा रणबीरच्या रुपात परत आणतानाचा एक व्हिडिओ ‘फॉक्स स्टार’कडून सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. जवळपास चार मिनिटांच्या या व्हिडिओत रणबीरचा ‘मुन्ना भाई’पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

संजय दत्त आणि मुन्ना भाई या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. त्यामुळे मुन्ना भाईसाठीच रणबीरला जवळपास १३- १५ लूक टेस्ट द्यावे लागले. लूकमधले बारकावे टिपण्यासाठी प्रॉस्थेटिक मेकअपचा कशाप्रकारे वापर करण्यात आला तेसुद्धा या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे शूट झाल्यानंतर ‘मुन्ना भाई एमबीबीएस’चे दृश्य एडीटींग करून कशाप्रकारे ‘संजू’मध्ये दाखवण्यात आले हेसुद्धा त्यात आहे.

Video: वयापेक्षा मोठ्या महिलेला का डेट करतोय निक; त्यानेच केला खुलासा

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ बॉक्स ऑफीसवर घसघशीत कमाई करत आहे. ३०० कोटींच्या कमाईकडे चित्रपटाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. २९ जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘संजू’ने बॉक्स ऑफीसवर आतापर्यंत बरेच विक्रम मोडले आहेत. रणबीर कपूरच्या करिअरला एक वेगळं वळण देणारा हा चित्रपट ठरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 2:59 pm

Web Title: watch how ranbir kapoor transformed himself into everyones favourite munna bhai character
Next Stories
1 साराच्या करिअरमध्ये करिना करतेय अशी मदत
2 Video: वयाने मोठ्या महिलेला का डेट करतोय निक; त्यानेच केला खुलासा
3 ब्लॉग- ‘मधुबाला’ कोणी साकारावी?
Just Now!
X