News Flash

VIDEO : लगीन घाईची धम्माल गोष्ट सांगणाऱ्या ‘वेडिंगचा शिनेमा’चा टीझर पाहिलात का?

मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, प्रवीण तरडे अशी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे.

मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, प्रवीण तरडे अशी एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातलं लग्न आणि पुढे होणारी लगीन घाई याची धम्माल गोष्ट सांगणारा ‘वेडिंगचा शिनेमा’ एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लग्नाची बदलत चाललेली संकल्पना आणि त्यातून घडणाऱ्या धम्माल गंमती जंमती या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. पारंपरिक रीतीरिवाज ते लग्नातले आधुनिक ट्रेंड यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो. मात्र यांचा ताळमेळ साधताना अनेक मजेशीर गोष्टी घडत असतात याच विषयाची हलकी फुलकी कथा ‘वेडिंगचा शिनेमा’ त दाखवली आहे.

मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, प्रवीण तरडे यांच्यासोबतच सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे यांसारखे कलाकारही या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ‘वेडिंगचा शिनेमा’तून शिवराज वायचळ आणि रिचा इनामदार ही नवोदित जोडीही चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. डॉ. सलील कुलकर्णी यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनाची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे. हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 5:48 pm

Web Title: watch marathi movie wedding cha shinema teasear
Next Stories
1 घटस्फोटाचा निर्णय बदलण्याचा कुटुंबीयांनी दिला होता सल्ला – मलायका
2 Pulwama Terror Attack : ‘नोटबुक’च्या निर्मात्यांकडून शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २२ लाखांची मदत
3 TRAILER : सुवासिक प्रेमकहाणीचा थरारक ‘परफ्युम’
Just Now!
X