बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नसतो. परंतु जेव्हा कधी तो कुठलीही पोस्ट शेअर करतो, तेव्हा तो सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. यावेळी त्याने एका इमारतीत चौकीदाराचं काम करणाऱ्या एका सर्वसामान्य व्यक्तीचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवश्य पाहा – रुपेरी पडद्यावर ‘सविता भाभी’ साकारणारी पहिली अभिनेत्री

अवश्य पाहा – छत्रपती शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर कसं होत? पाहा त्यांनी स्वत:च्या हातांनी लिहिलेलं पत्र

काय आहे या फोटोत असे?

आशिष हरसोरा या ट्विटर हँडलवरुन राधे नामक एका चौकीदाराचा फोटो पोस्ट करण्यात आला. तो एक उत्तम चित्रकार आहे. इमारतीची चौकीदारी करत असताना रात्री दोन वाजता त्याने अक्षय कुमारचं चित्रं काढलं होत. या चित्रासोबतचा त्याचा फोटो ट्विट करण्यात आला.
याच ट्विटला अक्षय कुमारनं रिट्विट केलं आहे. “अद्भभुत! हा व्यक्ती खरंच खुप हुशार आहे. देव तुझं भलं करो.” अशा आशयाचं ट्विट करुन अक्षय कुमारनं त्याचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.

अक्षय कुमारचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्या व्यक्तिचे कौतुक केले आहे.