बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगने ९०चे दशक गाजवले होते. अमृताचे लाखो चाहतो या आधी ही होते आणि आज ही आहेत. अमृता आणि तिची मुलगी सारा अली खान यांची मस्ती आणि यांच्यामधील प्रेम तर सगळ्यांना माहित आहे. मात्र, एका मुलाखतीत अमृताने सांगितले की, जर साराने लवकर कोणाशी लग्न केले तर ती तिला मारेन करेल.

अमृताने ‘सिम्मी गैरेवाल’च्या कार्यक्रमात हजेरी लावली होती, त्यात तिने सैफची आई शर्मिला टागोर यांनी सैफ आणि अमृताच्या लग्नाबद्दल कशा प्रतिक्रिया दिल्या होत्या ते सांगितले आहे. शर्मिला टागोर यांनी चित्रपटात अमृताच्या सासूबाईंची भूमिका साकारली होती. मात्र, जेव्हा अमृता त्यांची खरी सुन म्हणून पहिल्यांदा शर्मिला यांना भेटली तेव्हा त्या अमृतावर ओरडल्या. एवढ्या घाईघाईने इतके मोठे पाऊल उचलल्यामुळे त्या खूप काही बोलत होत्या.

त्यावर “जर साराने असे केले आणि कमी वयात कोणाशी लग्न केले तर?” अशा प्रश्न अमृताला विचारण्यात आला. “तिने असे काही केले तर मी नक्कीच तीला मारेन” असे अमृता म्हणाली.

अमृता आणि सैफने १९९१ मध्ये लग्न केलं. तेव्हा अमृता ३३ वर्षांची तर सैफ हा फक्त २१ वर्षांचा होता. त्या दोघांनीही कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते.

मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत, एकदा सैफने चित्रपटसृष्टीतील त्याच्या कारकीर्दीचे संपुर्ण श्रेय त्याने पूर्वाश्रमीची पत्नी अमृताला दिले होते. “मी २० वर्षांचा असताना घरातून पळून गेलो आणि लग्न केले होते. चित्रपटसृष्टीत एक ओळख निर्माण करण्यासाठी त्या कामाला किती गंभीरतेने घ्यावे लागते हे अमृताने मला शिकवले. तेव्हाच परंपरा हा चित्रपट मला मिळाला. म्हणून संपुर्ण श्रेय हे अमृताला जाते.” असे सैफ म्हणाला होता.