26 January 2021

News Flash

अक्षयची पत्नी मोठी स्टार का नाही? ट्विंकलने मीम्स शेअर करत सांगितलं कारण

हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू येईल..

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तसेच ती बऱ्याचवेळा तिच्या सडेतोड वक्तव्यांसांठी देखील चर्चेत असते. नुकताच ट्विंकलने एक मीम्स शेअर केले आहे. सध्या या मीम्सची जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या मीम्समध्ये अक्षय कुमारची पत्नी मोठी स्टार का नाही? असे विचारण्यात आले आहे.

ट्विंकलने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हे मीम्स शेअर केले आहे. या मीम्समध्ये कॅप्टन अमेरिका आणि क्रिस यांच्यामधील एक सीन दाखवण्यात आला आहे. कॅप्टन अमेरिका विचारतो की अक्षय कुमारची पत्नी मोठी स्टार का नाही? त्यावर जॅसपर विचारतो का? त्यावर उत्तर देत ‘कारण ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार’ असे म्हटले आहे. सध्या हे मीम्स चर्चेत असून ते पाहून तुम्हालाही हसू येईल.

हे मीम्स शेअर करत ट्विंकलने ‘तुम्ही एक मोठे स्टार असल्याचे तुम्हाला कसे कळणार? जेव्हा तुम्ही एका अतिशय लोकप्रिय मीम्सचा भाग होणार’ असे म्हटले आहे. अक्षय कुमारची पत्नी एक मोठी स्टार का नाही? या प्रश्नाचे मीम्स शेअर करत दिलेले हे भन्नाट उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 3:52 pm

Web Title: why is akshay kumar wife not a big star twinkle khanna share hilarious meme as answer avb 95
Next Stories
1 झी टॉकीजचा विशेष चित्रपट महोत्सव
2 …म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात काळजी करत नाहीत; चेतन भगत यांनी सांगितली तीन कारणं
3 “जशी राऊत औषधे डॉक्टरऐवजी कंपाऊंडरकडून घेतात त्याप्रमाणे…”; ‘नॉटी’ कमेंटवरुन भाजपा नेत्याचा टोला
Just Now!
X