छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस १४.’ सध्या या शोमध्ये तिन सीनिअर्सची एण्ट्री झाली आहे. अभिनेत्री हिना खान, गौहर खान आणि सिद्धार्थ शुल्काचा यामध्ये समावेश आहे. पण सध्या हिना खान चर्चेत आहे. हिनाने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षराची भूमिका साकारली होती. तिच्या या पहिल्यावहिल्याच मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. पण या मालिकेमुळे तिला चित्रपट गमवावे लागले असे विधान तिने केले आहे.
बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यापूर्वी हिनाने पिंकव्हिलाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या अभिनय करिअर विषयी वक्तव्य केले. ‘मला माझी पहिली मालिका एक ऑडिशन दिले आणि मिळाली. ते खूप सोपं होतं. त्यानंतर मला स्ट्रगल करावे लागले. मला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. मी जवळपास आठ वर्षे ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत काम केले. त्यावेळी मला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. पण मला नकार द्यावा लागला होता’ असे हिना म्हणाली.
View this post on Instagram
Meet me, if you want to sprinkle a little lime in your Margarita #SundayVibes
‘मालिका सुरु असताना मला अनेक चित्रपटांच्या ऑफर नकाराव्या लागल्या. त्यानंतर जेव्हा मी मालिका सोडली आणि पुढे जाण्याचा विचार केला तेव्हा माझ्यासाठी कठिण काळ सुरु झाला होता. एकदा एका चित्रपट निर्मात्याने मला म्हटले मी तुला माझ्या चित्रपटात घेऊ इच्छितो पण जेव्हा मी इंटरनेटवर जाऊन सर्च केलं तर तू फक्त ये रिश्ता क्या कहलाता है या एकच मालिकेत काम केल्याचे कळाले’ असे हिनाने पुढे म्हटले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 11:25 am