News Flash

सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे, विचारणारे आहेतच – अन्विता फलटणकर

‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधील 'स्विटू'ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका जानेवारी महिन्यात सुरु झाली आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमकार प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अन्विता फलटणकर एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. मालिकेचा एकंदरीतच असलेला विषय आणि स्वीटूची व्यक्तिरेखा ही बऱ्याच मुलींसाठी खूप रिलेटेबल आहे.

वजनदारपणा बद्दल आपलं मत व्यक्त करताना स्वीटू म्हणजेच अन्विता म्हणाली, “मालिकेचा विषय साधारण त्याबद्दल असला तरीही सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे, विचारणारे आहेतच. कधीकधी खूप उदास वाटत असल्यावर या गोष्टींचा कुठेतरी फरक पडतो. पण मी आधीपासून अशीच आहे. त्यामुळे मी या परिस्थितीला हाताळायला शिकले आहे. आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे ‘मी सुंदर आहे का?’ हा प्रश्न मला पडलेला आहे. पण माझ्या आयुष्यात काही माणसांनी मला खूपच सकारात्मकता दिली. मी सगळ्यांना हेच सांगेन की, तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं असणं महत्त्वाचं आहे.”

आणखी वाचा : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधील त्या सीनवरील मीम्स पाहून हसू होईल अनावर

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेची कथा स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी या पात्रांभोवती फिरत आहे. तसेच एका गरीब घरातील मुलगी श्रीमंत घरातील सून होणार असल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर हे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 12:18 pm

Web Title: yeu kashi tashi mi nandayla fem anvita
Next Stories
1 ‘साराभाई’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन
2 यामी गौतम पाठोपाठ ‘ये जवानी…’मधील ‘लारा’ने केले लग्न
3 “व्हाटस्अप मेसेजवर विश्वास ठेवू नका”, दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर
Just Now!
X