24 February 2021

News Flash

इस्लामसाठी निवृत्ती घेतली मग पुनरागमन का? – कमाल खान

'मला इस्लाम धर्म चित्रपटात काम करण्याची परवानगी देत नाही'

बिग बॉसच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेला कमाल खान नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. या वेळी तो अभिनेत्री झायरा वसीमवर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आहे. त्याने झायराला इस्लाम धर्माचा दाखला देत अमिर खानची चमची असे म्हटले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री झायरा वसीम हिने पाच वर्षांपूर्वी बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. दंगल गर्ल म्हणून नावारुपाला आलेल्या झायराने कमी वयात एक अष्टपैलु अभिनेत्री म्हणून ओळखली मिळवली. परंतु यशाच्या शिखरावर मार्गक्रमण करत असतानाच तिने सिनेसृष्टीतून कायमची निवृत्ती घेतली. त्यावेळी तिने ‘हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते,’ असे म्हणत आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले होते. परंतु निवृत्तीनंतरही द पिंक इज स्काय या आगामी चित्रपटात काम केल्यामुळे कमाल खान याने आक्षेप घेत तिच्यावर टीका केली आहे.

“इस्लाम धर्म झायराला चित्रपटात काम करण्याची परवानगी देत नाही, तरीही द पिंक इज स्काय या चित्रपटात तिने का काम केले. तिने केवळ चर्चेत येण्यासाठी हे निवृत्तीचे नाटक केले. ती आमिर खानची चमची आहे. प्रसिद्धी कशी मिळवतात हे तिला चांगलेच माहित आहे”, असे वक्तव्य कमाल खानने झायराविषयी बोलताना केले होते.

झायराने ही पोस्ट लिहित निवृत्ती घेतली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_) on

अभिनेता कमाल खानला बॉलिवूडमधील स्वघोषित समीक्षक असे म्हटले जाते. तो सतत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने तब्बल १८ अभिनेत्रींबाबत अश्लील आणि आक्षेपार्हतेची विधाने होती. यासाठी वर्सोवा पोलीस ठाण्यात रिझवान सिद्धीकी या वकिलाने त्याच्याविरुद्ध तक्रार देखील दाखल केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 10:02 am

Web Title: zaira wasim krk kamal khan the sky is pink mppg 94
Next Stories
1 सोना मोहपात्राचे अनु मलिकबाबत वादग्रस्त विधान
2 बाप रे… रंगेहाथ पकडलंत; प्रियांका चोप्राचं महाराष्ट्र पोलिसांना उत्तर
3 केबीसीला मिळाला पहिला करोडपती
Just Now!
X