सध्या लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक जण घरात बसून कंटाळला आहे. चित्रपट, मालिका यांचं चित्रीकरणही बंद असल्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होत नाहीये. त्ंयामुळे झी टॉकीजने एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे.  टॉकीज प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रेक्षकांना सुपरहिट ठरलेले चित्रपट पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा मे महिना प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. झी टॉकीज संपूर्ण मे महिन्यामध्ये प्रेक्षकांसाठी 5 मेगा चित्रपट महोत्सव सादर करीत आहे. याद्वारे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या वाहिनीवर ब्लॉकबस्टर चित्रपटांची मेजवानी  मिळणार आहे.

“छप्पर फाड  फिल्म फेस्टिव्हल” या आठवड्यात दररोज संध्याकाळी ७ वाजता ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ , ‘दे धक्का’, ‘काकस्पर्श’ , ‘लै भारी’ , ‘सैराट’, ‘मुळशी पॅटर्न’ या सारखे  ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यानंतर ११ ते १  मे या काळात संध्याकाळी  ७  वाजता  ‘झपाटलेला’, ‘गाढवाचं लग्न’, ‘धुमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’ हे सदाबहार चित्रपट प्रेक्षकांना ‘धुवाधार फिल्म फेस्टिव्हल’ च्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत. तर १८ ते २३ मे  या कालावधीत ‘देवाक  काळजी चित्रपट महोत्सव’ या मध्ये ‘हुप्पा हुय्या’, ‘देऊळ बंद’, ‘बोला अलख निरंजन’ या सारखे आत्म्यास जागृती देणारे भक्तिमय चित्रपट संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

२५ मे ते ३० मे या आठवडा “डबल धमाकेदार” असणार आहे. “चिल्लर पार्टी ” आणि “सोनेरी पान” या  फिल्म फेस्टिवल्स च्या माध्यमातून ‘नाळ’, ‘फॅन्ड्री’, ‘धप्पा’, ‘नटसम्राट’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटरंग’, आणि ‘माहेरची साडी’.  या सारख्या काळजाला भिडणाऱ्या आणि निखळ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांची मेजवानी सर्व प्रेक्षकांना दर सकाळी ११ संध्याकाळी आणि ७ वाजता मिळणार आहे. लॉकडाऊनमुळे घरी राहून संपूर्ण परिवारासोबत या मनोरंजनाच्या मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षक देखील सज्ज असतील यात शंकाच नाही.