News Flash

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगितिक मैफीलीचं आयोजन

चिरतरुण आवाज आणि तेवढाच सळसळता उत्साह याने रसिक प्रेक्षकांना कैक वर्ष भारावून टाकणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगितिक मैफीलीचं आयोजन

चिरतरुण आवाज आणि तेवढाच सळसळता उत्साह याने रसिक प्रेक्षकांना कैक वर्ष भारावून टाकणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले येत्या ८ सप्टेंबरला ८७व्या वर्षात पदार्पण करतायत. आशाताई गेली तब्बल सहा दशकं भारतीय संगीत क्षेत्रामध्ये स्वतःचं वेगळं आणि अढळ स्थान राखून आहेत. त्यामुळे आशाताईंच्या या आगामी वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्यांच्या या योगदानाला साजेशा पद्धतीने करण्यासाठी झी टॉकीज पुढे सरसावलीये. झी टॉकीजने आशाताईंच्या या खास दिनाचं औचित्य साधत तब्बल तीन तासाच्या संगीतमय मैफिलीचे आयोजन केले आहे.

भारतीय शास्त्रीय संगीत, रविंद्र संगीत, कव्वाली, लोकसंगीत याबरोबरच आशाताईंनी स्वरबद्ध केलेल्या गाजलेल्या चित्रपटगीतांचा आस्वाद या मैफीलीमधून प्रेक्षकांना घेता येईल. आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैश्यंपायनसारखे युवा गायक तर उर्मिला मातोंडकर, राधिका आपटे, भुमी पेडणेकर यांसारखे बॉलिवूडमधले नामांकीत चेहरे या मैफिलीमध्ये परफॉर्म करणार आहेत.

येत्या रविवारी म्हणजे सहा सप्टेंबरला झी टॉकीजवर रात्री नऊ वाजता हा सांगितिक सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 1:10 pm

Web Title: zee talkies wishes the melodious queen asha bhosleji a happy birthday with a 3 hour tribute ssv 92
Next Stories
1 असहिष्णूतेची चर्चा करणारे आता कुठे गेले?; संजय राऊतांच्या ‘हरामखोर’ टिप्पणीवर कंगनाचा सवाल
2 Video : भोजपुरी म्युझिक अल्बमसाठी अनुभव सिन्हा आणि मनोज वाजपेयी एकत्र!
3 ‘तारक मेहता का उलटा चष्मा’फेम नट्टू काका रुग्णालयात दाखल
Just Now!
X