‘बाहुबली’नंतर अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. या चित्रपटात प्रभाससह बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०१९मधील बिग बजेट चित्रपट ठरला आहे. त्यामुळेच या चित्रपटासाठी प्रत्येक कलाकारानेदेखील तितकंच दमदार मानधन घेतलं आहे. त्यातच आता या चित्रपटातील एका गाण्यासाठी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने किती मानधन घेतलं हे समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसापूर्वी या चित्रपटातील बॅड बॉय हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं प्रभास आणि जॅकलीन यांच्यावर चित्रीत करण्यात आलं असून जॅकलीनने या गाण्यासाठी तब्बल २ कोटी रुपये घेतले आहेत. विशेष म्हणजे केवळ एका गाण्यासाठी इतकं मानधन घेतल्यामुळे अनेकांच्या नजरा जॅकलीनकडे वळल्या आहेत.

नीति मोहन आणि बादशहा यांनी स्वरबद्ध केलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या चित्रपटातील तीन गाणी प्रदर्शित झाली आहेत.

दरम्यान, २०१९ मधील साहो हा सर्वात बिग बजेट चित्रपट असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटासाठी प्रभास आणि श्रद्धा यांनी मोठं मानधन घेतलं असून सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभासने या चित्रपटासाठी १०० कोटींचं मानधन घेतलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजीत करणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 crore amount jacqueline fernandez paid saaho song ssj
First published on: 21-08-2019 at 15:53 IST