बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपने सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून त्याचे करिअर संपवले अशी धक्कादायक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. आता त्यापाठोपाठ आणखी एक पोस्ट त्याने लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने कुणीतरी ई-मेल अकाऊंट लॉगइन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच अभिनवने फेसबुकवर आणखी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचे ई-मेल अकाऊंट कोणीतरी लॉगइन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. आता कोणीतरी माझे ई-मेल अकाऊंट लॉगइन करण्याचा प्रयत्न केला होता. आता हे प्रकरण आणखी रंजक होत चालले आहे. खान नेमकं काय लपवतायेत. मला शांत करण्यासाठी ते इतके प्रयत्न का करत आहेत? अशा आशयाची पोस्ट त्याने केली आहे.

याआधीच्या पोस्टमध्ये अभिनवने, ‘अरबाज खान, सोहेल खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्या करिअरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळे ‘दबंग २’ सारखा चित्रपट माझ्या हातून गेला. अरबाज खानने माझ्याकडून हा प्रोजेक्ट हिसकावून घेतला. मला माझी साइनिंग रक्कम परत करावी लागली होती. माझ्याशी करार करणाऱ्या निर्मात्यांना धमक्या दिल्या गेल्या. माझ्या कुटुंबीयांतील महिलांवर बलात्काराच्या धमक्या दिल्या गेल्या,’ असे गंभीर आरोप केले होते.

त्यावर अरबाज खानने प्रतिक्रिया देत यावर लिगल कारवाई करत आहोत असे म्हटले आहे. तर सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी अभिनवला जे करायचं आहे ते करु द्या. त्यावर प्रतिक्रिया देऊन मी माझा वेळ वाया घालवणार नाही असे एका मुलाखतीमध्ये म्हटले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhinav kashyap takes on the khans again claims someone attempted to log into his email avb
First published on: 17-06-2020 at 21:15 IST