प्रकाश राज हे दाक्षिणात्य सिनेसृष्टी व बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे प्रकाश राज त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अनेक सामाजिक व राजकीय विषयांबद्दल, राजकारणाबद्दल मतं मांडत असतात. त्यांनी अशीच एक पोस्ट आज केली आहे, ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रकाश राज यांनी एक्सवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात म्हटलंय की प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज आज दुपारी ३ वाजता भाजपात प्रवेश करतील. “मला वाटतं की त्यांनी प्रयत्न केला, पण ते मला विकत घेण्याइतके श्रीमंत (वैचारिकदृष्ट्या) नाहीत हे त्यांना कळालं असेल. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो,” असं त्यांनी हा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं. याबरोबर त्यांनी जस्ट आस्किंग हा हॅशटॅग वापरला आहे.

Saranya Ponvannan
पार्किंगच्या जागेवरून वाद अन् थेट जीवे मारण्याची धमकी, प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात शेजारणीने पोलिसांत दिली तक्रार
three khans conspired to get actors like Fawad Khan banned in India
फवाद खानसारख्या कलाकारांवर बंदी घालण्यासाठी कट रचला, पाकिस्तानी अभिनेत्रीचे तिन्ही खानवर गंभीर आरोप
wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

सोशल मीडियावर काही युजर्सनी प्रकाश राज भाजपात सामील होणार असल्याच्या पोस्ट शेअर केल्या होत्या, त्यापैकीच एक पोस्ट शेअर करत आपण भाजपात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं, सोबतच भाजपाला टोलाही लगावला. त्यांनी केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

१३ व्या वर्षी लैंगिक शोषण झालं, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, “क्रिकेट अकादमीत एक मुलगा…”

प्रकाश राज हे भाजपाचे विरोधक आहेत. ते अनेकदा सोशल मीडियावर भाजपा सरकारने घेतलेल्या निर्णयांवर टीका करताना दिसतात. काही वेळा ते त्यांच्या विधानामुळे वादातही अडकत असतात.