‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमासह त्यातील कलाकार नेहमी चर्चेत असतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. म्हणून या कलाकारांचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता प्रथमेश शिवलकर डाएट करत असल्याचं समोर आलं आहे. याबाबत त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रथमेश शिवलकरचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं. प्रथमेशने लाखोंची महिंद्रा थार घेतली. याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. सध्या प्रथमेश डाएट करत असून तीन महिन्यांच्या डाएट प्रवासानंतरचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रथमेश फार बारीक झाल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्याने डाएटमंत्र देखील सांगितला आहे.

Sunetra Pawar
राष्ट्रवादीच्या वाट्याचे राज्यमंत्रीपद कुणाला मिळणार? सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली मंत्री होण्याची इच्छा
NCP, bad language, women,
VIDEO : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ, तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील घटना
Murlidhar Mohol Taunt to Supriya Sule
मुरलीधर मोहोळांचा सुप्रिया सुळेंना टोला, “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांची मळमळ…”
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
mpsc Mantra Maharashtra Civil Services Gazetted Pre Exam History
mpsc मंत्र: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा: इतिहास
Sushma Andhare on Devendra Fadnavis
“देवेंद्र फडणवीस यांची ‘एक्झिट’ नक्की, आता विनोद तावडे…”, सुषमा अंधारे यांचं सूचक विधान
Girish Mahajan On Eknath Khadse
“एकनाथ खडसेंनी त्यांचा पक्ष कोणता हे सांगावं”; गिरीश महाजनांचा खोचक सवाल, म्हणाले, “भाजपावर बोलण्याआधी…”
Chhagan Bhujbal, Jitendra Awhad_FB
राष्ट्रवादीच्या दोन गटांमधला जिव्हाळा कायम? भाजपाची आव्हाडांवर टीका अन् भुजबळांकडून बचाव; आव्हाड म्हणाले, “मी तुमचा….”

हेही वाचा – “शिंदे सरकारच मल्टीप्लेक्सवाल्यांचा माज उतरवेल”, मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो न मिळण्याबाबत प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला…

प्रथमेशने फोटो शेअर करत लिहिलं आहे, “फॅट टू फिट होण्याच्या ३ महिन्यांच्या प्रवासानंतरचा पहिला फोटो. डाएट…व्यायाम…मसल…ट्रेनिंग…योग…मेडिटेशन…रिपिट. यामुळे सकारात्मक उत्साह मिळतो. हे स्वतःसाठी करा इतरांसाठी नको. महत्त्वाचं नो चीट डे.”

प्रथमेश शिवलकरचा डाएटनंतरचा फोटो पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “आता ओळखता येणार नाही की प्रथमेश कुठला आणि श्रमेश कुठला.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “एक नंबर.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “छान चाललं आहे भावा. असंच सुरू ठेवं.”

हेही वाचा – “शिंदे सरकारच मल्टीप्लेक्सवाल्यांचा माज उतरवेल”, मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो न मिळण्याबाबत प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला…

प्रथमेश शिवलकरचा भाऊ देखील आहे अभिनेता…

दरम्यान, प्रथमेशप्रमाणे त्याचा भाऊ रोहित शिवलकर अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. रोहितने प्रथमेशच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्र निवडलं आहे. सध्या रोहित शिवलकर ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘प्रेमास रंग यावे’ मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. रोहितच्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.