scorecardresearch

Premium

अभिनेत्री प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली; बॉयफ्रेंडसाठी लिहिली कविता

प्राजक्ता माळी तिच्या एका स्पेशल कवितेमुळे पुन्हा एकचा चर्चेत आलीय. तिच्या बॉयफ्रेंडसाठी तिने ही कविता केली असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय.

prajakta-mali-boyfriend

अभिनेत्री प्राजक्ता माळी अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. अभिनेत्रीसोबतच ती एक उत्कृष्ट नृत्यांगणा आणि सूत्रसंचालिका सुद्धा आहे. त्यानंतर आणखी एका नव्या भूमिकेतून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. नुकतंच तिने स्वतःचा काव्यसंग्रह ‘प्राजक्तप्रभा’ प्रकाशन पार पाडलंय. ग्रंथाली प्रकाशित ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आली आहे. त्यानंतर आता तिच्या एका स्पेशल कवितेमुळे पुन्हा एकचा चर्चेत आलीय. तिच्या बॉयफ्रेंडसाठी तिने ही कविता केली असल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय.

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. कधी ती शेअर करत असलेल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे तर कधी तिच्या हटके पोस्टमुळे…काही वर्षापूर्वी प्राजक्ता माळी तिच्या युरोप ट्रीपमुळे बरीच चर्चेत आली होती. तिच्या या यूरोप ट्रीपमध्ये एका मुलासोबतचे फोटोज शेअर केल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडबद्दल बरीच चर्चा सुरू झाली होती. फोटोमधला मुलगा तिचा बॉयफ्रेंड आहे का? अभिनेत्री प्राजक्ता माळी कुणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे का? असे अनेक प्रश्न तिच्या फॅन्सना पडले होते. त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच तिच्या प्रेमाची कबुली दिलीय. इतकंच नाही तर तिने तिच्या बॉयफ्रेंडसाठी कविता लिहून प्रपोज केलं होतं.

ABhishek Ghosalkar Valentines day
“हमारी अधुरी कहानी…”, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिवंगत अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची भावूक पोस्ट, Video व्हायरल
Shahrukh Khan Qatar PM
“मोदींनी नव्हे, कतारमधील भारतीयांना शाहरुखने सोडवलं”, भाजपा नेत्याचा दावा; किंग खानच्या कार्यालयाने केला खुलासा
Manoj Jarange Patil Maratha reservation
मराठा समाजाच्या किती आणि कोणत्या मागण्या मान्य झाल्या? मनोज जरांगेंनी वाचली यादी
Prajakta Mali recalls Old break up
“तो सतत खोटं बोलत होता आणि…”, प्राजक्ता माळीचा ‘त्या’ रिलेशनशिपबद्दल खुलासा; म्हणाली, “त्याचे पुरावे…”

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केलाय. अभिनेत्री प्राजक्ता माळी जेव्हा अकरावीत होती, त्यावेळी ती एका मुलाच्या प्रेमात पडली होती. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तिने एक कविता लिहिली होती. प्रेमाचां रंग ओळखल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या पेनाने तिने ही कविता लिहीली होती. “प्यार, इश्क, मोहब्बत…ये लब्जभी…सरल शब्द जैसे, सरल नहीं…तो क्या इसके रास्ते और मंजिले क्या खाक सरल होंगे….” अशा ओळींची तिने ही प्रेम कविता लिहिली होती.

या मुलाखतीत तिने आपल्या पहिल्या प्रेमाची कबुली दिली असली तरी ती ज्याच्या प्रेमात पडली होती, त्या बॉयफ्रेंडचं नाव मात्र तिने सांगितलेलं नाही. सध्या प्राजक्ता सिंगल असल्याचं सांगितलं जातंय. काही दिवसांपूर्वीच तिनं तिच्या लग्नासंदर्भातही एक खुलासा केला होता. ‘तशी लग्नाची तयारी सुरू आहे; पण नवरदेव भेटणं अद्याप बाकी आहे’,असं तिने म्हटलं होतं. तिच्या लग्नासाठी आईने सोने खरेदी आणि इतर तयारी केव्हाच सुरू केली आहे. नवरा मुलगा मिळाला, की लग्न करेनच, असं देखील तिने म्हटलं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress prajakta mali confesses her love for the first time poem written for boyfriend prp

First published on: 25-07-2021 at 18:42 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×