scorecardresearch

अभिनेत्री स्वरा भास्करला ठार मारण्याची धमकी

“सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, त्यांच्याबद्दल काही बोललीस तर…” असं पत्रात म्हटलेलं आहे.

swara bhaskar
(संग्रहीत छायाचित्र)

अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना देण्यात आलेल्या धमकीचे प्रकरण ताजे असताना, अभिनेत्री स्वरा भास्कर हिलाही ठार मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. स्वराला तिच्या राहत्या घरी स्पीड पोस्टद्वारे एक पत्र मिळाले असून त्यात अत्यंत हीन भाषेत, अपशब्द वापरून धमकी देण्यात आली आहे. सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, तसेच त्यांच्याबद्दल काही बोललीस तर जीवाला मुकशील, असे पत्रात म्हटले आहे.

हे पत्र नवी दिल्ली येथून पाठविण्यात आले आहे. या पत्रात थेट स्वराची हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. सावरकरांचा अपमान करणे थांबव आणि फक्त चित्रपटांवर लक्ष केंद्रीत कर, नाहीतर अंतिम संस्कार होतील, असे या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात स्वराने वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, स्वराने २०१७ मध्ये एक ट्विट केले होते. त्यात सावरकरांबद्दल भाष्य केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress swara bhaskar threatened to kill mumbai print news msr

ताज्या बातम्या