ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला प्रेक्षकांची सध्या चांगलीच पसंती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तसे पाहिले तर अभिनेता रणबीर कपूरच्या चित्रपटांच्या वाटेला काही केल्या यश मिळत नव्हते. पण, ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाने रणबीरला चांगलेच तारले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंग करत चित्रपटाच्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ला हजेरी लावली होती. ‘ऐ दिल….’ सर्वत्र प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून धरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटासाठी करणच्या दिग्दर्शनापासून ते अगदी रणबीरच्या अभिनयापर्यंत साऱ्याचेत कौतुक केले जात आहे. चित्रपटगृहांबाहेर काही प्रेक्षकांनी तर रणबीरच्याच नावाचा कल्ला केल्याचे चित्र आहे. ‘रणबीर या चित्रपटामध्ये चमकला आहे. या चित्रपटाचा तोच कणा असून काळानुरुप त्याचे अभिनय कौशल्य आणखीनच खुलत जात आहे’, अशी प्रतिक्रिया एका प्रेक्षकाने दिली आहे.

रणबीरच्या अभिनयासोबतच अनुष्का आणि ऐश्वर्यासोबतची त्याची जोडीही प्रेक्षकांनी पसंत केली आहे. विशेषत: या चित्रपचातील अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लूकलाही अनेकांनी दाद दिली आहे. देशभरातील विविध चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये सर्वात जास्त चर्चेत आली ती म्हणजे रणबीर आणि अॅशची केमिस्ट्री. पण, या चित्रपटामध्ये ऐश्वर्याची भूमिका कमी वेळासाठी असल्यामुळे चाहत्यांची तितकिच निराशाही झाली. अवघ्या पंधरा मिनिटांसाठीच ऐश्वर्या या चित्रपटामध्ये दिसत आहे. त्यामुळे तिची भूमिका आणखी काही वेळ रंगवायला हवी होती अशी प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. अशा प्रकारे अडचणी आणि काही गोड क्षणांची गोळाबेरीज करत प्रदर्शित झालेला हा चित्रपट येत्या काळात किती कमाई करणार याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. तुर्तास ट्विटरवरही ‘ऐ दिल है…’ ट्रेण्डमध्ये आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ae dil hai mushkil audience reaction ranbir kapoor shines srk cameo appreciated
First published on: 28-10-2016 at 17:22 IST