‘बबड्या’ आता एका वेगळ्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘अग्गंबाई सासुबाई’ या मालिकेत आशुतोष पत्कीने बबड्याची भूमिका साकारली होती.

Aggabai Sasubai, Ashutosh Patki, Ashutosh Patki as a producer,

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय ठरलेल्या मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई.’ या मालिकेतील शुभ्रा आणि बबड्याची जोडी विशेष गाजली होती. शुभ्रा ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली होती. तर बबड्या ही भूमिका अभिनेता आशुतोष पत्कीने साकारली आहे. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी बबड्या आणि शुभ्रा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेनंतर आशुतोष पुन्हा कधी भेटीला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आशुतोष आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आशुतोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरु केल्याचे सांगितले आहे. ‘नमस्कार रसिक प्रेक्षकहो… दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या मुहूर्तावर मला तुम्हाला हे सांगायला आनंद होतोय की आज मी एका नवीन उपक्रमाची सुरुवात करतोय आशुतोष पत्की एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तुमच्यासाठी काहीतरी छान कंटेन्ट आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्याचा “श्री गणेशा” दिवाळीच्या मुहूर्तावर होतोय.. तुमची साथ कायम असू द्या’ या आशयाची पोस्ट आशुतोषने केली आहे.
आणखी वाचा : किरणशी लग्न करण्यासाठी आमिरला द्यावे लागले होते ५० कोटी, लग्नाच्या १५ वर्षांनंतर घेतला घटस्फोट

आशुतोषच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aggabai sasubai actor ashutosh patki turns producer avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या