अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीने मिलन लुथरिया यांच्या ‘तडप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या पहिल्यावहिल्याच चित्रपटात अहानने काही इंटिमेट सीन्स दिले आहेत. त्याविषयी त्याने एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केले आहे.

अहानने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये इंटिमेट सीन विषयी बोलताना तो म्हणाला, ‘मी चित्रपटात इंटिमेट सीन्स देताना अनकम्फर्टेबल होतो. जेव्हा मी चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा माझ्यासोबत कोणती अभिनेत्री असणार हे ठरले नव्हते. देवा, आता मी कसा सीन शूट करु हे माझ्या डोक्यात सतत सुरु होते. कोणासोबत मला असे सीन्स द्यावे लागणार आहेत असा प्रश्न मला पडला होता.’
Video: फोटोग्राफर्ससमोर वडिलांनी केलेलं कृत्य पाहून अरबाज मर्चंटने कपाळावर मारला हात, म्हणाला “बस…”

पुढे तो म्हणाला, ‘पण नंतर एक अभिनेता म्हणून मला असे सीन द्यावे लागणार असा मी विचार केला. तसेच हा एक चित्रपटाचा भाग आहे. मी अहान म्हणून काम करणार नाही तर सीनमधील त्या भूमिकेसाठी काम करेन.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहान शेट्टी आणि तारा सुतारिया यांचा ‘तडप’ हा चित्रपट तेलुगू ‘आरएक्स १००’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट ३ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून अहान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आता अहान आणि ताराची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते की नाही हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.