बॉलिवूडची ‘क्यूट गर्ल’ आलिया भट्ट सध्या तिच्या वैयक्तीक आणि प्रोफेशनल आयुष्यात फार आनंदी दिसत आहे. ‘राजी’ आणि ‘गली बॉय’च्या यशानंतर आलियाकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. तसेच तिने बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ताज स्वत:च्या नावे करुन घेतला आहे.

फिल्मफेअर पुरस्कारादरम्यान झालेल्या संवादामध्ये आलियाने काही दिवसांपूर्वी तिला झालेल्या आजाराचा खुलासा केला. या आजरात आलियाला काही कारण नसताना रडण्याची ईच्छा होत असल्याचे सांगितले. सुरुवातीच्या काळात आलियाला आपल्याला नक्की काय झाले आहे आणि या बाबत आपण कोणासोबत बोलावे हे कळत नव्हते. नंतर हळूहळू तिने तिच्या मित्र-मैत्रीणींना याबाबत सांगितले. त्यांनी दिलेल्या धीरामुळेच आलिया या आजाराचा सामना करु शकली असल्याचे तिने सांगितले.

‘या आजाराला नैराश्य म्हणता येणार नाही पण या आजारादरम्यान मला बराच वेळा अस्वस्थ वाटत होते’ असे आलिया म्हणाली. आलियाची बहिण शाहिनने नैराश्येचा सामना केला होता. त्यामुळे नैराश्याची लक्षणे आणि सवयी आलियाला माहिती होत्या. त्यामुळे तिला झालेला आजार हा नैराश्य नसून दुसरं काही तरी आहे याचा निष्कर्ष आलियाने लावला होता. यापूर्वी दीपिका पादुकोण, शाहरुख खान, इलियाना डिक्रूज आणि अनुष्का शर्माने या आजाराबाबत सगळ्यांनी उघडपणे बोलायला हवे असा सल्ला दिला होता.

सध्या आलिया ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘कलंक’ चित्रपटामध्ये व्यग्र आहे. या दोन चित्रपटांनंतर आलिया एस. एस. राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटात दिसणार आहे