अलका कुबल यांची ‘वाकडकर ज्वेलर्स’ आणि ‘जानकी ज्वेलर्स’ला भेट

हसतमुख चेहरा आणि लाघवी स्वभावाच्या जोरावर अभिनेत्री- निर्माती अलका कुबल यांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

अलका कुबल यांचे भेटवस्तू देऊन स्वागत करताना ‘वाकडकर ज्वेलर्स’चे चिंतामणी विष्णू वाकडकर, आनंद चिंतामणी वाकडकर आणि अमोघ आनंद वाकडकर.

लोकसत्ता सुवर्णलाभ योजना

मुंबई : दिवाळीसाठी सोनेखरेदीला आलेलं उधाण आणि अभिनेत्री अलका कु बल यांची भेट असा दुग्धशर्करा योग शनिवारी ग्राहकांना अनुभवता आला. सोनेखरेदीवर बक्षिसांची लयलूट जिंकण्याची संधी देणारी ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजना’ सध्या दणक्यात सुरू आहे. या योजनेत सहभागी झालेल्या विलेपार्ले येथील ‘वाकडकर ज्वेलर्स’ आणि ‘सी. ए. पेंडुरकर अ‍ॅण्ड कंपनी’ (जानकी ज्वेलर्स) या दोन्ही ठिकाणी अलका कु बल यांनी भेट दिली.

हसतमुख चेहरा आणि लाघवी स्वभावाच्या जोरावर अभिनेत्री- निर्माती अलका कुबल यांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आपल्या कौटुंबिक चित्रपटांतून एक काळ गाजवणाऱ्या, रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या अलका कु बल यांनी निर्माती म्हणूनही यशस्वी कारकीर्द उभारली. त्यांची भेट घेण्याची संधी शनिवारी, ३० ऑक्टोबर रोजी ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजनें’तर्गत वाकडकर ज्वेलर्स आणि सी. ए. पेंडुरकर अ‍ॅण्ड कं पनी (जानकी ज्वेलर्स) येथे सोनेखरेदीसाठी आलेल्या पार्लेकरांना मिळाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि  रुणवाल  ग्रुप सहप्रायोजित ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’चे ग्राहकांनी खूप उत्साहात स्वागत केले आहे. सुवर्णखरेदीचा हा उत्सव ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेत अगदी एक ग्रॅमच्या सोनेखरेदीपासून ते आकर्षक ज्वेलरीपर्यंत कोणत्याही खरेदीवर बक्षिसे जिंकण्याची अनोखी संधी मिळणार आहे. सोनेखरेदीवर बक्षिसे लुटायचा हा आनंद अनुभवायचा असेल तर लवकरात लवकर या योजनेत सहभागी असलेल्या सराफांना भेट द्या आणि सोने खरेदी करा.

 सहभाग कसा घ्याल?

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’त सहभागी असलेल्या सराफांकडून ग्राहकांनी उपरोक्त कालावधीत तीन हजार रुपये वा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने वा सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत. खरेदी केलेल्या या दागिन्यांवर ग्राहकांना एका बिलावर एक प्रवेशिका दिली जाईल. ही प्रवेशिका पूर्ण भरून तेथील ड्रॉप बॉक्समध्ये टाका आणि एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन अशी आकर्षक बक्षिसे जिंका.

या योजनेच्या शेवटच्या दिवशी सर्व दुकानांमधून प्रवेशिका जमा केल्या जाणार आहेत. या सर्व प्रवेशिका एकत्र करून सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाईल. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मधून जाहीर केली जातील. या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत.

प्रायोजक

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’चे सहप्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि रुणवाल ग्रुप, प्लॅटिनम पार्टनर लागू बंधू आणि एम. के. घारे ज्वेलर्स. गोल्ड पार्टनर – श्री नेमिनाथ ज्वेलर्स आणि सी. ए. पेंडुरकर अ‍ॅण्ड कं पनी, तर सिल्व्हर पार्टनर वाकडकर ज्वेलर्स आणि चिंतामणीज् ज्वेलर्स हे आहेत. तसेच आय के अर पार्टनर श्री रामकृष्ण नेत्रालय हे असून उषा एजन्सी गिफ्ट पार्टनर आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Alka kubal wakadkar jewelers visit to janaki jewelers akp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन