कान चित्रपट महोत्सवावरून अभिनेते अमिताभ बच्चन मुंबईत दाखल झाल्यानंतर बॉलिवुडचा हा मेगास्टार टेलिव्हीजन मालिका ‘भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप’मध्ये दिसणार आहे. मुंबईत परतल्यानंतर अमिताभ बच्चन महाराणा प्रताप या मालिकेसाठीच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या मालिकेत अमिताभ बच्चन कोणती भूमिका साकारत आहेत ते अद्याप समजू शकलेले नाही.
कान चित्रपट महोत्सवावरून मुंबईत परतल्याचे अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले. त्याचबरोबर कान चित्रपट महोत्सवाचा यावेळचा अनुभव उत्कृष्ट असल्याचेही त्यांनी ट्विट केले.
महाराणा प्रताप या टेलिव्हीजन मालिकेत ‘डान्स इंडीया डान्स लिटील मास्टर-२’ चा विजेता फैजल खान हा मुख्य भुमिका साकारत आहे.