कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी रोजी हा दिवस उत्साहात साजरा झाला. मात्र अमिताभ बच्चन यांनी २७ ऐवजी २८ फेब्रुवारी रोजी ट्विटरच्या माध्यमातून मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ओळी पोस्ट करत त्यांनी या शुभेच्छा दिल्या. मात्र एक दिवस उशीरा या शुभेच्छा दिल्याने नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बींनी मराठीत ट्विट करत लिहिलं,
‘मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
-संत ज्ञानेश्वर​.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan tweets about marathi bhasha din and gets trolled ssv
First published on: 28-02-2020 at 12:06 IST