शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत आहे. मात्र या भूमिकेसाठी नवाजुद्दीन आधी अनेक बड्या कलाकारांच्या नावाचा विचार झाला होता. यात खुद्द अमिताभ बच्चन यांच्या नावाचादेखील विचार झाला असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते व शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत दिली.

‘बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित चित्रपट यावा अशी माझी इच्छा होती. या चित्रपटासाठी वाट्टेल ती मदत करण्याची तयारीही मी दर्शवली होती. मात्र काही कारणांमुळे हे शिवधनुष्य कोणीही पेललं नाही. अखेर मी बाळासाहेबांच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याचं ठरवलं. या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणार कोण असा पेच माझ्यासमोर पडला. या भूमिकेसाठी अनेक बड्या कलाकारांच्या नावांचा विचार झाला होता, खुद्द बच्चन यांच्या नावाचाही विचार केला होता’ असंही संजय राऊत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. या चित्रपटाच्या पोस्टर लाँचच्या वेळी खुद्द अमिताभ बच्चन यांनीदेखील चित्रपटात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.  मात्र काही कारणांमुळे बच्चन यांच्या नावाऐवजी  नवाजुद्दीन सिद्दीकीचं नाव या चित्रपटासाठी निश्चित करण्यात आलं.

Raj Thackeray Told About Film Shakti
राज ठाकरेंचं चित्रपट प्रेम आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘शक्ती’ सिनेमातील प्रसंगाचा ‘तो’ किस्सा
Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष