प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या आई वडिलांवर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलीय. अनिकतेची पत्नी स्नेहाने तिच्या पतीसहीत सासू, सासऱ्यांकडून आपल्याला मारहाण केली जात असल्याचा आरोप करत पुण्यातील अलंकार पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केलीय. या प्रकरणामध्ये अनिकेत बरोबरच त्याचे वडील चंद्रकांत आणि आई अदितीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. मात्र या प्रकरणावर आता अनिकेतने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्या पत्नीने माझ्यावर केलेले आरोप हे खोटे असल्याचं अनिकेतने म्हटलं आहे. मी माझ्या पत्नीला मारहाण करतो अशी जी तक्रार दाखल करण्यात आली ती साफ खोटी आहे, असा दावा अनिकेतने ‘पुढारी’ या वेबसाईटशी बोलताना केलाय. त्याचवेळी अनिकेतने मी आणि पत्नी एकत्र राहत नसल्याचंही सांगितलं आहे. ती पुण्यात असते तर मी मुंबईमध्ये राहतो असं अनिकेतने म्हटलं असून आम्ही अजून घटस्फोट घेतलेला नाही असंही त्याने स्पष्ट केलं आहे. आम्ही दोघे मागील अनेक महिन्यांपासून एकत्र राहत नसून पुढील परिस्थितीबद्दल आताच काही सांगू शकत नाही, असं अनिकेत म्हणालाय.

नक्की पाहा हे फोटो >> मैत्री, प्रेम, लग्न ते कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; अशी सुरु झाली होती अनिकेत विश्वासराव आणि स्नेहाची लव्हस्टोरी

पत्नीने आपल्याविरोधात अशी तक्रार का केली आहे याची काहीच कल्पना आपल्याला नाही असंही अनिकेत म्हणाल आहे. हे का केलं जात आहे मला कळत नाहीय. मला अजून पोलीस स्थानकामधून कोणताही फोन आलेला नाहीय. त्यामुळे याबद्दल मी अधिक बोलू शकत नाही, असंही अनिकेत म्हणालाय.

स्नेहाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षाच्या काळात सिनेमा सृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aniket vishwasrao first comment about domestic violence complaint filed by his wife sneha chavan scsg
First published on: 20-11-2021 at 12:22 IST