बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘मनमर्जिंयां’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. पण आता सिनेमाचा दिग्दर्शक अनुराग कश्यपने तापसीला सेटच्या बाहेर काढले होते. हे आम्ही नाही तर खुद्द तापसीची इन्स्टाग्रामची पोस्टच सांगते. तापसी सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. ती अनेकदा सेटवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळीही तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोत ती आणि अनुराग दिसत आहेत. फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘जेव्हा दिग्दर्शक तुम्हाला सेटच्या बाहेर काढतो.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेअर केलेल्या फोटोमध्ये तापसीने निळ्या रंगाचा कुर्ता आणि हिरव्या रंगाचा पायजमा घातला आहे. ती बसलेली असताना अनुराग तिला जाण्याचा इशारा करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापसी आणि अनुराग अमृतसरमध्ये सिनेमाचे चित्रीकरण करत आहेत. तापसीप्रमाणेच अनुरागही सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. त्यानेही तापसीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये तो तापसीच्या मांडीत बसलेला दिसत आहे. अनुरागच्या या फोटोला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.

‘मनमर्जिंयां’ सिनेमातून अनुराग आणि तापसी पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. तर अनुरागचा अभिनेता विक्की कौशलसोबतचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी दोघांनी राघव २.० मध्ये एकत्र काम केले होते. अनुरागच्या या सिनेमात अभिषेक बच्चनचीही मुख्य भूमिका आहे. आनंद एल रायने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anurag kashyap said taapsee pannu to leave the sets of manmarziyaan
First published on: 11-03-2018 at 18:26 IST