बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका चित्रपटसृष्टीत सक्रीय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा १९ वर्षांचा झाला, त्यानंतर ते दोघंही वेगळे झाले होते. १९९८ साली या दोघांनी लग्न केलं होतं आणि २०१७ साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका आणि अरबाज या दोघांनीही करिअरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. सध्या मलायका ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चाही सिनेसृष्टीत सुरु आहेत. नुकतंच मलायका आणि अर्जुनच्या लग्नाबाबत अरबाज खानने प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन कपूर येत्या एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबद्दल विविध बातम्याही समोर येत आहेत. नुकतंच इंडिया टुडेच्या एका मुलाखतीदरम्यान मलायका अरोराचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानला याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावर तो म्हणाला, “तुम्ही मला खूप बुद्धिमान प्रश्न विचारला आहे. यासाठी तुम्ही खूप मेहनत केली असेल, रात्रभर बसून यावर विचार केला असेल. मलाही तुमच्या या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. पण तुम्ही विचार करायला एवढा वेळ घेतला आहात, मग यावर विचार करण्यासाठी मलाही थोडा वेळ द्या. मी याचे उत्तर उद्या सांगितले तर चालेल का?”. त्याने गमतीशीर पद्धतीने हा प्रश्नावर उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

तर दुसरीकडे मलायकाने अर्जुनसोबत लग्न करण्याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. ‘व्हाइट वेडिंगपेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही’ असे तिने यावेळी म्हटले. तर याबाबत अर्जुन कपूर म्हणाला की, ‘आमचा सध्या लग्नाचा कोणताही विचार नाही. मी अद्याप याबद्दल विचार केला नाही, परंतु मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे मी ते लपवणार नाही’, असे त्याने सांगितले.

“आदित्य चोप्रांनी मला यशराज फिल्म्सच्या इन-हाऊस हिरोईन बनण्याची ऑफर दिली होती, पण…”; अमृता रावने केला धक्कादायक खुलासा

बॉलिवूडमध्ये सध्याचे सर्वांचे लाडके कपल म्हणून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर ओळखले जाते. ते अनेकदा बाहेर एकत्र फिरताना, पार्टीला जाताना दिसतात. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. येत्या एप्रिल महिन्यात ते दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Story img Loader