अर्जुन रामपालच्या आयुष्यात तिची एण्ट्री?

गेब्रिएला एक विदेशी मॉडेल असून ती अर्जुनमुळे चर्चेत आली आहे.

arjun rampal
अर्जुन रामपाल, arjun rampal

बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या ब्रेकअप, पॅचअप, घटस्फोट याविषयी कायमच चर्चा रंगताना पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया यांची जोरदार चर्चा सुरु होती. ‘मिस इंडिया’चा किताब पटकावणाऱ्या मेहर जेसिया आणि अर्जुननं वीस वर्षांचा संसार मोडला. त्यानंतर अर्जुनचे सूत मॉडेल गेब्रिएला दिमित्रियादिस हिच्याबरोबर जुळल्याचं समोर येत आहे. काही दिवसापूर्वीच या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’नुसार, अर्जुन -मेहरच्या नात्याविषयीची चर्चा थांबत नाहीत तोच आता त्याचं नाव गेब्रिएलाबरोबर जोडलं गेलं आहे. गेब्रिएला एक विदेशी मॉडेल असून ती अर्जुनमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसापूर्वी हे दोघं मुंबईमधील एका हॉटेलमध्ये डिनर डेटला गेल्याचं समोर आलं आहे. या डिनर डेटवरील त्यांचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत नाही.

 

दरम्यान, डिनर डेटला गेलेल्या या जोडीला कॅमेरामध्ये कैद करण्यात आलं असून व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अर्जुनने ब्लू कलरचा टी-शर्ट घातला आहे. तर गेब्रिऐला काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे. यापूर्वी अर्जुनचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेल्याचं पाहायला मिळालं आहे. अभिनेता हृतिक रोशनची पत्नी सुजैनबरोबरही अर्जुनचं नाव जोडलं गेलं होतं. इतकचं नाही तर नताशा स्टेनकोविकलाही तो डेट करत असल्याचं सांगण्यात येत होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Arjun rampal and gabriella demetriades spotted on a dinner date