मनी हाईस्टच्या हिंदी रिमेकच्या फर्स्ट लूक व्हायरल; अर्जुन रामपाल साकारणार प्रोफेसरची भूमिका?

एका चाहत्याने मला आशा आहे की बॉलीवूड मनी हाईस्टला कडवी टक्कर देऊ शकेल असे म्हटले आहे.

Arjun rampal started shoot money heist hindi remake three monkeys
(Photos: Instagram/rampal72 and Netflix)

सध्या बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सची घोषणा करताना दिसत आहेत. त्याचवेळी, या सगळ्यामध्ये आणखी एका अभिनेत्याचा आगामी प्रोजेक्ट प्रचंड चर्चेत आला आहे. मोस्ट अवेटेड प्रोजेक्ट ‘थ्री मंकी’चा फर्स्ट लुक त्याच्या सोशल अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा चित्रपट ‘मनी हाईस्ट’ या प्रसिद्ध स्पॅनिश मालिकेचे भारतीय रूपांतर असल्यामुळे हा प्रकल्प बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

या चित्रपटामध्ये अर्जुन रामपाल ‘इंडियन प्रोफेसर’च्या भूमिकेत दिसणार आहे. अर्जुनने त्याच्या ‘थ्री मंकी’चा फर्स्ट लुक त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अर्जुन रामपालने त्याच्या इंस्टाग्राम त्याचा अर्धा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने ब्राऊन जॅकेट आणि पांढरा शर्ट घातला आहे. या फोटोत त्याच्या मागे कॅमेरा आणि लाईट दिसत आहेत. हा फोटो त्याच्या बहुप्रतिक्षित आगामी प्रोजेक्टच्या शूटचा आहे. ‘थ्री मंकीज’मधील अर्जुन रामपालचा हा फर्स्ट लूक असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

ही पोस्ट शेअर करत अर्जुनने कॅप्शनमध्ये ‘लाइट्स कॅमेरा अॅक्शन. पुन्हा सेटवर. एका प्रवासाची सुरुवात’ असे लिहिले आहे. त्याने या पोस्टसोबत #ThreeMonkeys #abbasmustanhusain हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. हा फोटो पाहून अनेकजण अर्जुन रामपालला ‘देसी प्रोफेसर’ म्हणत आहेत. कमेंट करताना एका यूजरने, ‘आमचे भारतीय प्रोफेसर’ या लूकमध्ये खूप पसंत केले जात आहे असे लिहिले आहे.

अर्जुनची गर्लफ्रेन्ड, मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने या फोटोवर एक इमोजी टाकला आहे. तर एका चाहत्याने मला आशा आहे की बॉलीवूड मनी हाईस्टला कडवी टक्कर देऊ शकेल असे म्हटले आहे.

थ्री मंकीजचे दिग्दर्शन अब्बास अलीभाई बर्मावाला आणि मस्तान अलीभाई बर्मावाला करणार आहेत. पाच वर्षानंतर या चित्रपट निर्मात्या जोडीचे दिग्दर्शनात पुनरागमन होणार आहे.

स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेल्या आठ जणांना एकत्र आणून ‘प्रोफेसर’ मोठ्या चोरीचा प्लॅन आखतो हे या सिरीजचे कथानक आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात सध्या लोकप्रिय ठरलेली ‘मनी हाईस्ट’ ही वेब सीरिज एकेकाळी सुपरफ्लॉप ठरली होती. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ‘नेटफ्लिक्स’वर या वेब सीरिजचा चौथा सिझन प्रदर्शित झाला. आता हा सिझन एका निर्णायक वळणावर आला असून पाचव्या सिझनचीही प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Arjun rampal started shoot money heist hindi remake three monkeys abn

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन