अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘झेंडा’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं होतं. महाराष्ट्रातील एका सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबातील घमासान त्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांनी पाहिलं. ‘झेंडा’ हा चित्रपट राजकारणातले सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडणारा होता. अवधूत गुप्ते यांना हा चित्रपट करताना अडचणी आल्या पण तो चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता.

‘Boyz 3’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटाचे सादरकर्ते अवधूत गुप्ते आणि चित्रपटातील मुख्य कलाकार तसेच दिग्दर्शक विशाल देकरुखकर यांनी ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. त्यानिमित्ताने लोकसत्ता डिजीटलच्या संपूर्ण टीमशी त्यांनी गप्पा मारल्या आणि चित्रपटामागील बरेच किस्से त्यांनी शेअर केले.

Western Maharashtra Status and Direction of Co operative Movement Maharashtra Day 2024
पश्चिम महाराष्ट्र: सहकार चळवळ दशा आणि दिशा
Loksatta readers Reaction on lokrang article
पडसाद : आदर्शवत नेत्यांचा काळ आठवला
Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
Pimpri, Pimpri Mahayuti meeting
पिंपरी : महायुतीच्या बैठकीत नाराजी नाट्य! बारणे यांचा प्रचार करणार नाही, आरपीआय गटाची भूमिका

आणखी वाचा : जॉनी डेप आणि अँबर हर्ड प्रकरण चित्रपटाच्या माध्यमातून येणार समोर; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मने केली घोषणा

याच मुलाखतीमध्ये अवधूत गुप्ते यांना नुकत्याच महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय नाट्यावर चित्रपट काढणार का? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी एक धमाल उत्तर दिलं. अवधूत गुप्ते यांनी या ताज्या राजकीय नाट्यावर एखादी सीरिज किंवा ‘झेंडा’सारखे १० वेगवेगळे चित्रपट निघू शकतात असं सांगितलं. “झेंडामध्ये विठ्ठला कोणता झेंडा घेऊन हाती हे कार्यकर्त्याच्या तोंडी होतं, सद्यस्थिती पाहता ते वाक्य नेत्यांच्या तोंडी दिसतंय.” अशी टिप्पणीदेखील त्यांनी या मुलाखतीमध्ये केली. तूर्तास यावर अजूनतरी काही ठोस विचार केला नसल्याने अवधूत गुप्ते यांच्या राजकीय नाट्यावर बेतलेल्या चित्रपटासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.

‘Boyz 3’ हा चित्रपट आजच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. यामध्ये पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, विदुला चौगुले, प्रतीक लाड, समीर चौगुले हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशाल देवरुखकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे तंर अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलं आहे. यातील गाणी चांगलीच लोकप्रिय झाली आहेत. या चित्रपटाचे आधीचे दोन्ही भाग प्रचंड गाजले होते. या भागातही लोकांना मनोरंजनाचा तीनपट डोस मिळेल अशी आशा आहे.