आयुषमान खुराना हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना कायमच नेहमी पेक्षा वेगळे विषय पाहायला मिळतात. तो आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचेही काम करतो. त्यामुळे आयुषमान आता केवळ एक उत्तम अभिनेता म्हणूनच नव्हे तर जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून चर्चेत आहे. टाईम मॅगझिनने जगातील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या यादीत आयुषमान खुराना या एकमेव भारतीय अभिनेत्याचं नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – “इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वी अनुरागने मला खोलीत बोलावलं”, अन्…; अभिनेत्रीचा खुलासा

अवश्य पाहा – “मी कधीही ड्रग्ज घेतले नाहीत”; दिया मिर्झा NCBच्या रडारवर

आयुषमानने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. चाहत्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दीपिका पदुकोणने देखील आयुषमानची स्तुती केली. “मला आयुषमानचा विक्की डोनर हा चित्रपट खुप आवडला. खर तर तो गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत काम करतोय. पण चित्रपटांनी त्याला खरी ओळख मिळवून दिली. त्याने कायमच इतर पुरुष अभिनेत्यांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्याने सिनेसृष्टीची पारंपारिक चौकट मोडून काढली. आयुषमान नक्कीच एक प्रभावशाली अभिनेता आहे.” अशा आशयाची पोस्ट करुन दीपिकाने आयुषमानचं कौतुक केलं आहे. प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushmann khurrana 100 most influential people in the world narendra modi mppg
First published on: 23-09-2020 at 12:37 IST