श्रेयस तळपदे आणि अमृता खानविलकरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठीतला पहिला सुपरहिरो या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘सनई चौघडे’ (२००८) चित्रपटानंतर तब्बल सहा वर्षांनी श्रेयस ‘बाजी’ चित्रपटाद्वारे पुनर्पदार्पण करतोय. श्रेयसची निर्मिती असलेल्या पोश्टर बॉइज चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर तो बाजीमध्ये आता मुख्य भूमिकेत दिसेल.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये श्रेयस हा सुपरहिरो आणि सामान्य पुरुष अशा दोन भूमिकांमध्ये दिसतो. सामान्यांचा वाली म्हणून तो चित्रपटात दिसेल. तर दुसरीकडे जितेंद्र जोशी पुन्हा एखदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी जितेंद्र जोशीने पूर्ण टक्कल केले असून भूमिकेबरहुकूम शरीरयष्टी दिसण्यासाठी व्यायाम करण्याची मेहनतही केली आहे. दार मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला ‘बाजी’ हा चित्रपट फेब्रुवारीत प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baji official theatrical trailer
First published on: 09-12-2014 at 03:26 IST