‘बेफिक्रे’ स्टार रणवीर सिंगने सुष्मिता सेनच्या मुलींसोबत एक छानसा सेल्फी घेतला. या फोटोला सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. रिनी आणि एलिसा यांची लोकांची निवड फारच चांगली आहे. सुष्मिताने लिहिले की, ‘दोघीही रणवीर सिंग आणि त्याचा स्वभाव पाहून आनंदी झाल्या. त्यानेही या क्षणासाठी आवर्जुन वेळ काढला. ‘चांगला माणूस तोच असतो जो चांगले काम करतो. रणवीर खरंच एक चांगला माणुस आहे. तुझी अशीच प्रगती होवो. मी तुला मिस करेल.’
काही दिवसांपूर्वी सुष्मिताने तिच्या दोन्ही मुलींचा बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबतचा फोटो शेअर केला होता. तेव्हा शाहरुख आणि सुष्मिता एकाच विमातानून प्रवास करत होते. मुंबईला येण्यासाठी त्या दोघांनी एकच विमान पकडले होते. सुष्मितासोबत तिच्या दोन्ही मुलीही होत्या. शाहरुखला भेटून त्या दोघींना फारच आनंद झाला होता. यावेळी रणवीर सिंगने सुष्मिताच्या या दोन्ही मुलींना सुखद धक्का दिला. त्याने आपल्या व्यग्र कारभारातून वेळ काढत रिनी आणि एलिसा या मुलींची भेट घेतली होती.
दरम्यान, रणवीर सध्या ‘बेफिक्रे’ सिनेमातील बोल्ड सीनवरुन सिनेवर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहेत. या सिनेमातील च्युंबन दृश्यांमुळे याआधीच रणवीर आणि वाणी चर्चेत होते. बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग आणि वाणी कपूरच्या ‘बेफिक्रे’ सिनेमात प्रेम आणि प्रेमसंबंध यांच्याबद्दल वेगळा दृष्टीकोन टाकण्यात आला आहे. सिनेमात रणवीर दिल्लीचा एक मुलगा दाखवण्यात आला आहे. तर वाणी कपूर पॅरिसला राहणारी एक मुलगी. एका ट्रिपसाठी म्हणून रणवीर पॅरिसला जातो. त्याच्या या ट्रीपच्या शेवटी त्याला वाणी भेटते आणि तिकडून खऱ्या सिनेमाला सुरुवात होते.